ग्रामीण रुग्णालयांत वैद्यकीय अधीक्षकांची वानवा

By Admin | Updated: July 2, 2016 00:20 IST2016-07-02T00:20:37+5:302016-07-02T00:20:37+5:30

अमरावती विभागाची स्थिती: ६१ पैकी ४४ ठिकाणची पदे रिक्त.

Medical Superintendent of Rural Hospital | ग्रामीण रुग्णालयांत वैद्यकीय अधीक्षकांची वानवा

ग्रामीण रुग्णालयांत वैद्यकीय अधीक्षकांची वानवा

दादाराव गायकवाड/ वाशिम
अमरावती विभागातील शासकीय आरोग्य व्यवस्था पार कोलमडली असून, या विभागातील पाच जिल्ह्यांतील ग्रामीण रुग्णालयांतील वैद्यकीय अधीक्षकांची ६१ पैकी ४४ पदे रिक्त असल्याची माहिती आरोग्य उपसंचालकांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
ग्रामीण रुग्णालयातून गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळतो. लोकसंख्येच्या प्रमाणाप्रमाणे हे ग्रामीण रुग्णालय तालुक्यात १ किंवा २ ठिकाणी असते. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ३0 खाटा, चार तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी असतात; मात्र या ग्रामीण रुग्णालयांत वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य सेवक आणि सेविकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे गोरगरीब रुग्णांची परवड होत आहे.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत असलेल्या ग्रामीण रुग्णालयांत ६१ वैद्यकीय अधीक्षकांची गरज असताना या रु णालयांत केवळ १७ वैद्यकीय अधीक्षक कार्यरत असून, तब्बल ४४ पदे रिक्त आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे गोरगरिबांना चांगल्या आणि अगदी क्षुल्लक शुल्कावर मिळणार्‍या आरोग्य सुविधा दुरापास्त झाल्या आहेत. दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडणारे तरुण अनुभवासाठी सुरुवातीची काही वर्षे एखाद्या रुग्णालयांत काढून लगेचच आपला स्वतंत्र व्यवसाय थाटतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयांतील डॉक्टरांच्या रिक्त पदांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची पदे शासनाने त्वरित भरण्याची गरज व्यक्त होत आहे.

ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची रिक्त पदांची जिल्हानिहाय आकडेवारी
जिल्हा                   रिक्त पदे
यवतमाळ                १२
अमरावती                ११
बुलडाणा                 १0
वाशिम                   0६
अकोला                  0५
---------------------------
एकू ण                  ४४

Web Title: Medical Superintendent of Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.