इंधन दरवाढीमुळे यांत्रिक शेती आली अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST2021-07-18T04:10:10+5:302021-07-18T04:10:10+5:30

अमरावती : शेतीची कामे करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मजुरी न आटोपणारी ...

Mechanical farming was hampered by rising fuel prices | इंधन दरवाढीमुळे यांत्रिक शेती आली अडचणीत

इंधन दरवाढीमुळे यांत्रिक शेती आली अडचणीत

अमरावती : शेतीची कामे करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मजुरी न आटोपणारी कामे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी आपल्या शेतातील मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्‍टरचा वापर करीत आहेत. मात्र पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे यंत्राद्वारे शेती करणे कठीण होत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेतकरी आता पर्याय पिकाची लागवडीकडे वळला आहेत. दरम्यान काही शेतकरी बैलजोडीद्वारे शेतीची कामे करून घेत असतात. काही वर्षांपासून सालगड्याच्या मजुरीत वाढ झाल्याने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर होत आहे. शेतीतील संकटामुळे अधिक उत्पन्न मिळत नसल्याने बळीराजाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. पेट्रोल, डिझेल किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याशिवाय खरिपाच्या हंगामातही शेतकऱ्यांना एकरी ३०० ते ५०० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. ट्रॅक्टरद्वारे करावयाच्या शेत मशागतीसाठी गेल्या वर्षी ८०० ते १०० रुपये द्यावे लागत होते; परंतु यंदा मात्र पंधराशे ते अठराशे रुपये विक्री भाव झाले आहेत. इंधन महाग झाल्याने ट्रॅक्टर चालकांनी दरातही वाढ केली असून हे भाव सर्वांना परवडणारे नसल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कोट

डिझेल जवळपास १०० रुपयांच्या जवळपास जाऊन पोहोचले आहे. नांगरणीचा खर्च ७०० रुपये, मजुरी ३०० रुपये, निंदण २५० रुपये, त्यातच बैलजोडीच्या मदतीने शेती करावी तर एका जोडीची किंमत लाखाच्या घरात आहे. औषधे, खतांच्या किमती शेतीला परवडण्यासारख्या नाहीत.

-भारत मानकर, शेतकरी

कोट

दरवाढीमुळे आम्हाला ही दरवाढ केल्याशिवाय पर्याय नव्हता अन्यथा हाती काहीच राहणार नाही. नांगरणी व अन्य कामासाठी एकरी ४०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. इंधन दरवाढ झालेली नाइलाज झाला आहे; परंतु पोटासाठी काही तरी उपाय करावा लागतो.

-भोजराज कावरे, ट्रॅक्टर मालक

Web Title: Mechanical farming was hampered by rising fuel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.