महापौरपदाची निवडणूक सप्टेंबरमध्ये
By Admin | Updated: July 9, 2014 23:12 IST2014-07-09T23:12:16+5:302014-07-09T23:12:16+5:30
नगराध्यक्षपदाच्या मुदतवाढीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता महापौरपदाची निवडणूकही निर्धारित वेळेत होण्याचे संकेत आहेत. निर्धारित कार्यक्रमानुसार महापौरपदाची निवडणूक

महापौरपदाची निवडणूक सप्टेंबरमध्ये
काँगे्रस-राष्ट्रवादीत तेढ : सर्वसाधारण जागेच्या आरक्षणाची शक्यता
अमरावती : नगराध्यक्षपदाच्या मुदतवाढीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता महापौरपदाची निवडणूकही निर्धारित वेळेत होण्याचे संकेत आहेत. निर्धारित कार्यक्रमानुसार महापौरपदाची निवडणूक सप्टेंबर महिन्यातच होईल.
शहाराचा १४ वा महापौर कोण? याबाबत अद्यापही राजकीय चित्र अस्पष्ट आहे. महापालिकेत काँग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता आहे. या दोन्ही पक्षात सत्तावाटपाचे सूत्रदेखील ठरले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाल्याचे सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेल्याने संजय खोडके गटाला मोठा हादरा बसला आहे. राष्ट्रवादीत गटनेते पदावरुन न्यायालयीन लढाई सुरु झाली आहे. सदस्य अपात्रतेचा तिढा देखील कायम आहे. अशातच पुढील महापौरपदावर राष्ट्रवादीचा दावा असल्याने सप्टेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काय चित्र असेल, याबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करताना आ. रावसाहेब शेखावत आणि माजी आमदार सुलभा खोडके यांनी आपसात अंतर्गत करार करुन काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर दोन वर्षांत राजकीय चित्र पूर्णपणे पालटले. यापूर्वी राष्ट्रवादीवर पूर्णपणे संजय खोडके यांचे वर्चस्व होते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर एकूणच राजकारण बदलले आहे.