महापौरांनी काढला दिवा, झेडपी अध्यक्षांचा कायम
By Admin | Updated: May 3, 2017 00:16 IST2017-05-03T00:16:50+5:302017-05-03T00:16:50+5:30
केंद्र सरकारच्या आदेशानंतर महापौरांनी त्यांच्या शासकीय गाडीवरील लाल दिवा काढला आहे.

महापौरांनी काढला दिवा, झेडपी अध्यक्षांचा कायम
आदेशाचे उल्लंघन : लाल दिवे निघणार तरी कधी?
अमरावती : केंद्र सरकारच्या आदेशानंतर महापौरांनी त्यांच्या शासकीय गाडीवरील लाल दिवा काढला आहे. मात्र, झेडपी अध्यक्षांच्या शासकीय गाडीवरील लाल दिवा कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील लाल दिवा हटविला असताना झेडपी अध्यक्षांच्या वाहनावरील लालबत्तीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
देशातील ‘व्हीआयपी कल्चर’ बंद करण्यासाठी लाल दिव्यांची दिवाळी बंद करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. त्याची तातडीने अंमलबजावणी करित मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यांच्या वाहनांवरील दिवे तातडीने हटविले. महापौरांनी सुद्धा वाहनावरील दिवा काढला. झेडपी अध्यक्षांच्या गाडीवरील दिवा मात्र कायम आहे. लाल दिवा हटविण्याची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली असली तरी यापूर्वीच बहुतांश मंत्री आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवरील अंबर दिवे काढले आहेत. सीईओंच्या वाहनावर तर मागील दोन वर्षापासून लाल दिवाच नाही. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहनावरील ‘लालबत्ती’ कायम आहे.(प्रतिनिधी)
शासकीय वाहनांवरील लाल दिवा काढण्यासाठी शासनाकडून अद्याप कुठलाही अध्यादेश वा परिपत्रक आले नाही. अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेऊ.
-नितीन गोंडाणे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद, अमरावती