महापौर, उपमहापौरपदाचे नामांकन
By Admin | Updated: September 6, 2014 01:26 IST2014-09-06T01:26:03+5:302014-09-06T01:26:03+5:30
येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी ८ सदस्यांनी शुक्रवारी नामांकन अर्ज सादर केले आहे.

महापौर, उपमहापौरपदाचे नामांकन
अमरावती : येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी ८ सदस्यांनी शुक्रवारी नामांकन अर्ज सादर केले आहे. नामांकन अर्ज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यत दाखल करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट यांच्यात आघाडी होण्याची दाट शक्यता आहे.
महापौर पदाकरीता भाजपच्या हेमलता साहु, मंजुषा जाधव तर शिवसेनेच्या रेखा तायवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सपना ठाकूर, जयश्री मोरय्या, बसपाच्या गुंफाबाई मेश्राम, हमीदाबी शेख अफजल चौधरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर नंदा या ८ महिला सदस्यांनी नामांकन दाखल केले आहे. उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार, भाजपचे चंदुमल बिल्दाणी, छायाताई अंबाडकर, जनविकास काँग्रेसचे बाळासाहेब भुयार, नितीन देशमुख, शिवसेनेचे प्रशांत वानखडे, बसपाचे दीपक पाटील तर राष्ट्रवादी कॉग्रेस फ्रंटचे भूषण बनसोड यांनी नामांकन अर्ज सादर केले आहे.
खोडके गटाच्या सदस्यांची बैठक
महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने संजय खोडके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या १६ सदस्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत महापौर पदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीला संजय खोडके, सुलभा खोडके, अविनाश मार्डीकर, चरणजित कौर नंदा, जयश्री मोरे, हमीदा बानो शेख अफजल चौधरी, हमीद शद्दा, आसीफ हुसैन, मो. इमरान, ममता आवारे, सारीका महल्ले, सादीक आयडिया, वंदना हरणे, निलीमा काळे, मिलिंद बांबल, जावेद मेमन आदी उपस्थित होते.