मे महिन्यात म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:29+5:302021-05-30T04:11:29+5:30
कोरोनाची दुसरी लाट वेगावे पसरल्यामुळे रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यात कोविड-१९ ने नवे रूप धारण केल्याचे निदर्शनास आले. ...

मे महिन्यात म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण दगावले
कोरोनाची दुसरी लाट वेगावे पसरल्यामुळे रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यात कोविड-१९ ने नवे रूप धारण केल्याचे निदर्शनास आले. ज्यांना पोष्ट कोविड झाला त्या रुग्णांना औषधोपचारानंतर स्टेरॉईडचे प्रमाण अधिक झाल्यामुळे काळी बुरशीची लागण झाली. त्यातून म्युकरमायकोसिसची लक्षणे उदयास आली. कान, नाक, घसा, सायनसची लक्षणे असल्याने इएनटी चिकित्सकांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्ड १४ मध्ये दाखल असलेल्या ३५ रुग्णांची उपचाराची जबाबदारी डॉ. श्रीकांत महल्ले, सुजीत डागोरे, सोपविली आहे. त्यापैकी आठ रुग्णांना डोळ्याचा, दातांचा जबड्याचा त्रास असल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. १३ ते २१ मे पर्यंत उपचारा दरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील तेथील कर्मचाऱ्याने दिली.
कोट
इर्विन रुग्णालयात आतापर्यंत पाच म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण दगावले. यात जिल्ह्यातील दोन आणि इतर जिल्ह्यातील उपचारार्थ दाखल झालेल्यांपैकी तिघांचा समावेश आहे. कोविड झालेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी. शुगर वाढल्यास त्वरित डॉक्टरांंच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक