माऊलीच्या ज्ञानाचा कधी होणार प्रसार?
By Admin | Updated: December 9, 2015 00:28 IST2015-12-09T00:28:31+5:302015-12-09T00:28:31+5:30
माझा मराठाचि बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन मराठी भाषेविषयीचा अभिमान,

माऊलीच्या ज्ञानाचा कधी होणार प्रसार?
वारकरी अनुयायांचा सवाल : संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा
मोहन राऊत अमरावती
माझा मराठाचि बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठाची महती व्यक्त करणारे कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तीयोग सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानाचा प्रसार विदर्भात कधी होणार असा सवाल आज अनेक वारकरी संप्रदायातील अनुयांयानी निर्माण केला़
बुधवारला संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी दिवस ओळखला जातो़ ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली होती़ मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली आहेत़
संत ज्ञानेश्वरांचा जन्म १३ व्या शतकात झाला़ ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे मुळात संन्यासी होते़ विठ्ठलपंत तीर्थयात्रा करीत करीत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले़ त्याकाळी संन्यासाची मुले म्हणून ज्ञानेश्वरासह निवृती, सोपान, मुक्ताबाई यांचा सर्व समाज हेटाळनी करीत असत त्यांच्यावर मोठा अन्याय त्याकाळात करण्यात आला़ आई वडीलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणी त्यांच्या भावंडांना लोकांनी फार त्रास दिला़ अन्न व पाणी यासारख्या मुलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या पुढे ही भावंडे पैठणला गेली आणी तिथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्धता सिध्द केली़