दरोड्यातील मुख्यसूत्रधारच बॅग लिफ्टिंगच्या दोन गुन्ह्यात आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST2021-06-27T04:10:12+5:302021-06-27T04:10:12+5:30
अमरावती : माधवनगरातील दरोड्यातील मुख्य सूत्रधार समीर शहा हा नांदगावपेठ हद्दीत उघडकीस आलेल्या १६ लाख ५० हजारांच्या बॅग लिफ्टिंगच्या ...

दरोड्यातील मुख्यसूत्रधारच बॅग लिफ्टिंगच्या दोन गुन्ह्यात आरोपी
अमरावती : माधवनगरातील दरोड्यातील मुख्य सूत्रधार समीर शहा हा नांदगावपेठ हद्दीत उघडकीस आलेल्या १६ लाख ५० हजारांच्या बॅग लिफ्टिंगच्या दोन गुन्ह्यातील आरोपी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. समीर हा दरोड्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे, तर नांदगावपेठच्या बॅग लिफ्टिंगच्या दोन आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.
आरोपी रुपेश ऊर्फ बंटी राजेश चव्हाण (२५, रा. अमरावती), विशाल दीपक खराळे (३६, रा. मोर्शी ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना २४ जून रोजी शहर गुन्हे शाखेचे पथकाने अटक केली होती. समीर शाह याचा दोन्ही गुन्ह्यात सहभाग असून, दरोड्यातील गुन्ह्याचा तपास राजापेठ पोलिसांनी पूर्ण केल्यानंतर तपासासाठी त्याला नांदगावपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर यांनी सांगितले.
बॉक्स
असा झाला गुन्हा उलगडा
रोजी नांदगावपेठ हद्दीतील रिलायन्स पेट्रोलपंप येथील कॅश बँकेमध्ये कर्मचारी जमा करण्यासाठी जात असताना बॅग लिफ्टिंग करून लाखो रुपये चोरून नेले होते. याचा तपास करून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला. प्राप्तमाहितीनुसार, तसेच सन २०१८ मध्ये नांदगावपेठ येथील पेट्रोलपंप मधील लाखो रुपयांची कॅश डिलीव्हरी कंपनीमार्फत बँकेत जमा करण्यात येत होती. त्यावर आरोपीने या रुपेश चव्हाण, विशाल खराळे व अन्य एकाने वाटिका ढाबा नांदगावपेठ येथे फिर्यादीला अडवून जबरीने १२ लाख ९२ हजार रुपये हिसकले होते. त्याप्रमाणे वाईल्ड ग्लोरी हॉटेलसमोरून ४ लाख ५३ हजार रुपये नगदी चोरून नेले होते. या दोन्ही गुन्ह्याचा पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेने करून आरोपीला शिताफीने अटक केली.