मास्टर मार्इंड पांडेला आणले अमरावतीत
By Admin | Updated: May 14, 2016 00:09 IST2016-05-14T00:09:21+5:302016-05-14T00:09:21+5:30
समाज कल्याणचे बनावट कार्यालय उघडणाऱ्या मास्टर मार्इंड संजय यादव पांडेला गुन्हे शाखेच्या पथकाने वाराणसीत अटक केले असून

मास्टर मार्इंड पांडेला आणले अमरावतीत
वाराणसीत केली अटक : समाज कल्याण बनावट कार्यालयाचे प्रकरण
अमरावती : समाज कल्याणचे बनावट कार्यालय उघडणाऱ्या मास्टर मार्इंड संजय यादव पांडेला गुन्हे शाखेच्या पथकाने वाराणसीत अटक केले असून शुक्रवारी या आरोपीला अमरावतीत आणल्या गेले.
मार्डी रोडवर समाज कल्याण विभागाच्या नावाने बनावट कार्यालय उघडून आरोपींनी नोकरीसंदर्भात वृत्त पत्रात जाहिरात दिली. शासकीय पदभरती भासवून शहरातील काही बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळले. ही बाब लक्षात येताच समाज कल्याणच्या सहायक आयुक्त प्राजक्ता इंगळे यांनी गुन्हे शाखेची मदतीने बनावट कार्यालयाचा भांडाफोड केला. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने सुमीत गेडाम (अमरावती), अमोल धाबर्डे (वर्धा), दिपेश टावरी व गिता गडबडे या चार आरोपींना अटक केली. त्यांना गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. मात्र, याप्रकरणातील मुख्य आरोपी मास्टर मार्इंट संजय यादव पांडे (रा. वाराणसी) व मॅनेजर मनोज शहा (रा. सोनभद्र, उत्तर प्रदेश) हे दोघेही पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी फेसबूकच्या माध्यमातून मुख्य आरोपी संजय पांडेचा शोध घेतला. त्यावेळी संजय पांडे हा भोजपूरी अभिनेता असल्याचे पोलिसांना कळले. या आरोपीचे विविध नावाने फेसबुक अकाऊंट असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी आरोपी पांडेचा मोबाईल क्रमांक मिळविला. गुन्हे शाखेचे एपीआय कांचन पांडे यांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून लोकेशन मिळविले व त्यानंतर एपीआय पांडेसह पोलीस कर्मचारी धीरज जोग, शंकर बावनकुळे, अशोक वाटाणे यांचे पथक उत्तरप्रदेशातील वाराणसीत रवाना झाले होते. तेथे पोहचल्यानंतर आरोपीचा मोबाईल बंद असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे आरोपीचे लोकेशन पोलिसांना मिळत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आरोपी संजय पांडेच्या फेसबूकवरून अन्य काही माहिती मिळविण्याचे प्रयत्न केला. तेव्हा आरोपी पांडेच्या फेसबूकवरून एका चारचाकी वाहनाचा क्रमांक मिळविला. पांडेने खरेदी केलेल्या चारचाकी वाहनाचा चेचीस क्रमांक व मोबाईल क्रमांक पोलिसांनी मिळविला. त्या मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपी संजय पांडेचा शोध घेतला.
आरोपी तीन वेळा आला अमरावतीत
आरोपी संजय पांडे याने सर्वप्रथम नागपूरात एक कार्यालय उघडून तेथे चार ते पाच युवकांना नोकरी दिली. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्याने अमरावतीमधील मार्डी मार्गावर समाज कल्याणचे बनावट कार्यालय उघडले. हे कार्यालय उघडण्यापूर्वी तो तिनदा अमरावती येऊन गेल्याची कबुली आरोपी पांडेने पोलिसांना दिली.
पांडेचे वडील निवृत्त पीएसआय
आरोपी संजय पांडे हा निवृत्त पीएसआयचा मुलगा असून संजयला अनिल व सुशील हे दोन भाऊ आहेत. संजय हा भोजपुरी अभिनेता असून त्याने ये कैसन प्रथा व दम है तो आजा बिहार या दोन चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका केली आहे.
समाज कल्याणचे बनावट कार्यालय स्थापन करणारा मुख्य सूत्रधार संजय यादव पांडेला वाराणसीतून अटक करण्यात आली आहे.त्याने देशभरात सहा बनावट कार्यालये उघल्याची कबुली दिली आहे.
दिलीप पाटील,
पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.