मोझरीत ट्रकखाली चिरडून युवती ठार
By Admin | Updated: March 23, 2017 00:11 IST2017-03-23T00:11:52+5:302017-03-23T00:11:52+5:30
येथील नवीन बसस्थानक परिसरात नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकखाली येऊन नजीकच्या अनकवाडी येथील तरुण युवती ठार झाल्याची घटना ....

मोझरीत ट्रकखाली चिरडून युवती ठार
अपघात की आत्महत्या : विविध चर्चांना ऊत
गुरुकुंज मोझरी : येथील नवीन बसस्थानक परिसरात नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकखाली येऊन नजीकच्या अनकवाडी येथील तरुण युवती ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. नूतन साबळे (१८) असे मृत युवतीचे नाव आहे. ती येथील श्रीगुरूदेव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी होती.
कुटुंबियांसमवेत बसस्थानक परिसरात ती उभी होती. त्यांच्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती आहे. अकस्मात तरूणीने महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला असात नागपूरवरून अमरावतीकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकखाली येऊन तिचा मृत्यू झाला. मृत युवतीच्या आई, आजीसह एक अनोळखी तरूणही उपस्थित होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. बघ्यांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. घटनेनंतर ट्रकचालक पळून गेला. तिवसा पोलिसांनी मृताच्या आजोबांच्या तक्रारीवरून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.