मसानगंज परिसरात जुगार अड्ड्यावर धाड, १३ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST2021-03-15T04:13:38+5:302021-03-15T04:13:38+5:30
मसानगंज परिसरातील अनूप अरुण साहू याच्या राहत्या घरात जुगार सुरब असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ...

मसानगंज परिसरात जुगार अड्ड्यावर धाड, १३ जणांना अटक
मसानगंज परिसरातील अनूप अरुण साहू याच्या राहत्या घरात जुगार सुरब असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून अनूपसह शेख करीम शेख छोटू, मोहम्मद आसिफ कुरेशी अब्दुल जहीर, शेख महबूब शेख बाबा, शेख अल्ताफ शेख अशरफ, अब्दुल राजीक अब्दुल मुनाफ, पंकज राजू गुप्ता, सतीश छकीलाल बमनेल, राहुल बसंत साहू, संतोष सुखलाल गुप्ता, राहुल अमृतलाल बमनेल, सोहेल ऊर्फ परवेज खान सरदार खान, मोहमद एजाज शेख अब्दुल अफसर शेख अशा १३ आरोपींना ताब्यात घेतले.
बॉक्स
यांनी केली कारवाई
नागपुरी गेटच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात प्रभारी निरीक्षक संजय जव्हेरी, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लभाने, हवालदार प्रमोद गुडधे, बबलू येवतीकर, शिवनाथ आंधळे, विक्रम देशमुख, आनंद ठाकूर, आबिद व महिला पोलीस कविता सोळी व चालक संजय पवार यांनी आरोपींना अटक केली.