मंगल कार्यालय, लॉनसंबंधी बंदी आदेश मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:52+5:302021-03-17T04:13:52+5:30

चांदूर बाजार : तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका मंगल कार्यालये, लॉन तसेच संलग्न व्यावसायिकांना बसला आहे. ऐन ...

Mars office, revoke the ban on lawns | मंगल कार्यालय, लॉनसंबंधी बंदी आदेश मागे घ्या

मंगल कार्यालय, लॉनसंबंधी बंदी आदेश मागे घ्या

चांदूर बाजार : तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका मंगल कार्यालये, लॉन तसेच संलग्न व्यावसायिकांना बसला आहे. ऐन लग्नसराईच्या वेळीच व्यवसाय बंद झाल्याने जिल्ह्यातील हजारो कुटुंबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये व लॉन लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी चांदूर बाजार तालुक्यातील व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

तालुक्यासह जिल्हाभरात कोरोनाचा कहर वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तीन आठवड्यांपूर्वी लॉकडाऊन जाहीर केले. मात्र, काही दिवसांतच या लॉकडाऊनमध्ये व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली. केवळ मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ करण्याची परवानगी नाकारण्यात आली. या निर्णयामुळे बँड पार्टी, साऊंड सिस्टीम, डेकोरेशन, हलवाई, कॅटरिंग व्यावसायिक, वाढपी मुले, मुली, जेवण बनविणाऱ्या व भांडी धुवून उपजीविका करणाऱ्या तसेच लग्नपत्रिका तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर या निर्णयामुळे उपासमारी व बेरोजगारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात लवकरात लवकर मंगल कार्यालय व लॉन सुरू न झाल्यास व्यावसायिकांच्या कुटुंबांवर आत्महत्येची शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी सुमीत हरकुट, संतोष लंगोटे, मोहन विधळे, अजय तायडे, जय हरी चौधरी, विक्रम कडू, अमर मोहोड, अमोल रघुवंशी, पवन वानखडे, नीलेश चौधरी, नाजिमभाई, बबन ठाकरे, नितीन खरड, आशिष खरड, चंदू टिंगणे, भरत राठी, तन्वीर यांच्यासह मोठ्या संख्येने व्यावसायिक तहसील कार्यालयात उपस्थित होते.

Web Title: Mars office, revoke the ban on lawns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.