अल्पवयीन मुलीशी लग्न, व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST2021-04-07T04:13:46+5:302021-04-07T04:13:46+5:30
पोलीस सूत्रांनुसार, अल्पवयीन मुलगी व आरोपी युवक यांच्यात पाच वर्षांपासून ओळख होती. त्याच्या बहिणीची ती मैत्रिण. त्यामुळे तिला भेटण्यासाठी ...

अल्पवयीन मुलीशी लग्न, व्हिडीओ व्हायरल
पोलीस सूत्रांनुसार, अल्पवयीन मुलगी व आरोपी युवक यांच्यात पाच वर्षांपासून ओळख होती. त्याच्या बहिणीची ती मैत्रिण. त्यामुळे तिला भेटण्यासाठी ती त्याच्या गावीदेखील जात होती. त्यामुळे युवकाशी तिचे प्रेमसूत जुळले. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या.
दरम्यान, ३० मार्च रोजी पीडिता कॉलेजला जाण्यासाठी घरून निघाली. वाटेत तिला आरोपी युवक भेटला. तो दुचाकीवर तिला छत्रीतलाव स्थित महादेव मंदिरात घेऊन गेला. यादरम्यान आरोपीशी परिचित तीन महिलादेखील तेथे ऑटोरिक्षाने पोहोचल्या. आरोपीने अल्पवयीन मुलीच्या गळ्यात जबरीने हार घातला व मंगळसूत्र बांधून भांगेत शेंदूर भरला. या प्रसंगाचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्यात आला.
सदर प्रकाराने हादरलेल्या पीडिताने ५ एप्रिलला उशिरा रात्री फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाल विवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.