लग्न कर अन्यथा आत्महत्या करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST2021-06-22T04:10:33+5:302021-06-22T04:10:33+5:30

अमरावती: प्रेमसंबधानंतर लग्न करण्यास नकार दिला म्हणून एका युवतीचा विनयभंग केला. लग्न कर अन्यथा विष प्राशन करून आत्महत्या करेल ...

Marry tax otherwise commit suicide | लग्न कर अन्यथा आत्महत्या करेल

लग्न कर अन्यथा आत्महत्या करेल

अमरावती: प्रेमसंबधानंतर लग्न करण्यास नकार दिला म्हणून एका युवतीचा विनयभंग केला. लग्न कर अन्यथा विष प्राशन करून आत्महत्या करेल अशी एका युवकाने तरुणीला धमकी दिल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील विलासनगरात २० जून रोजी घडली. या प्रकरणी सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीससुत्रानुसार अनुभव अरुणराव धाकडे (रा. रमाबाई आंबेडकर नगर)

असे आरोपीचे नाव आहे. आरोपी व फिर्यादी तरुणीचे मागील ३ ते ४ वर्षापासून प्रेमसंबध होते. त्यानंतर तरुणीने युवकाला लग्न करण्यासंदर्भात वारंवार विचारले असता, मात्र युवकाने लग्न करण्यास नकार दिल्याने युवतीने त्याच्याशी बोलणे सोडले. मात्र आरोपी हा युवतीला वारंवार फोन करू लागला. मात्र युवतीचे लग्न जुळले. २० मे २०२१ रोजी टिळा लावण्याचा कार्यक्रमही झाला. मात्र त्याने २३ मे रोजी तिचे साक्षगंध असताना तेथे जावून तिचे लग्न मोडले. त्यानंतर तिने तु माझ्याशी लग्न केले तर विष प्राशन करेल. तुझा फोटो सोलश मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरेल्या तरुणीने अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार नोंदविली.

Web Title: Marry tax otherwise commit suicide