शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकावर विवाहितेचे अपहरण, दुसऱ्या दिवशी बळजबरी; तिघांविरुद्ध गुन्हा

By प्रदीप भाकरे | Updated: November 18, 2022 17:15 IST

मोर्शी तालुक्यातील घटना

अमरावती : गळ्याला चाकू लावून एका विवाहितेचे अपहरण करत दुसऱ्या दिवशी तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. १० ते ११ नोव्हेंबरदरम्यान मोर्शी तालुक्यातील लिहिदा गावानजिक ही घटना घडली. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी नितीन शंकर नांदणी (३०, लाडकी, ता. मोर्शी) व अन्य एका अनोळखी इसमांविरुद्ध १७ नोव्हेंबर रोजी बलात्कार, अपहरण व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

१० नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास २६ वर्षीय विवाहिता तिच्या आईच्या घरात असताना आरोपी नितीन नांदणी हा तिच्या घरात शिरला. विवाहितेच्या गळ्याला चाकू लावून एका अनोळखी व्यक्तीला सोबत घेऊन नितीनने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. तिला दुचाकीवर बसवून तो हिवरखेड येथे त्याच्या आत्याच्या घरी पोहोचला. मात्र, आरोपीच्या आत्याने तिला जेथून आणले, तेथे सहिसलामत सोडून दे, असा सल्ला नितीनला दिला.

मात्र, तिला घरी न सोडता तो तिला एसटीने बसने लिहिदा गावातील दुसऱ्या आत्याकडे घेऊन गेला. त्या आत्याने देखील तिला सुखरूप सोडून देण्याचाच सल्ला दिला. मात्र, रात्र झाल्याने त्या दोघांनी तेथेच मुक्काम केले. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास आरोपी तिला घेऊन आत्याच्या घरून बाहेर पडला. काहीवेळानंतर जंगलातील शिवारातील झोपडी गाठून त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणAmravatiअमरावतीMolestationविनयभंगsexual harassmentलैंगिक छळ