अमरावती : सासू व नणंदेच्या त्रासाला कंटाळून माझ्या बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप भावाने केला. ज्योती मंगेश साखरकर (२८, रा. चाकोरा) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चाकोरा गावात उघडकीस आली.ज्योतीचा भाऊ अंकुश राजेंद्र काजे (३२, रा. पुसनेर) यांच्या तक्रारीनुसार, ज्योतीला सासू शारीरिक व मानसिक त्रास देत होते, नणंद फोन करून मानसिक त्रास देत होती.सोमवारी सकाळी ज्योती यांच्या मृतदेहाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी माहेरच्या मंडळींनी या दोघींच्या अटकेची मागणी रेटून धरली होती. यानंतरच पार्थिव नेऊ, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. लोणी पोलिसांनी सासू व नणंदेविरुद्ध भादंविच्या कलम ४९८ (अ) व ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला. पोलिसांनी दोघींनाही अटक केल्यानंतर नातेवाइकांचा रोष शांत झाला.ज्योतीचे पार्थिव गावी घेऊन जात असताना, लोणीजवळ तिचे सासरे व दिराने ते वाहन अडविले. सासू व नणंद यांना सोडल्यानंतरच पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अशी मागणी त्यांनी केली होती. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ५०६, ५०७ अन्वये गुन्हा नोंदविला. त्यानंतर ज्योतीवर चाकोरा येथे अंत्यसंस्कार पार पडले.
सासू, नणंदेच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:08 IST
अमरावती : सासू व नणंदेच्या त्रासाला कंटाळून माझ्या बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप भावाने केला. ज्योती मंगेश साखरकर ...
सासू, नणंदेच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
ठळक मुद्देचाकोरातील घटना : आरोपींच्या अटकेसाठी आक्रोश