चार महिन्यांपासून विवाहित जोडपे बेपत्ता

By Admin | Updated: September 8, 2016 00:20 IST2016-09-08T00:20:55+5:302016-09-08T00:20:55+5:30

संजय गांधी नगरातील रहिवासी सचिन सिमोलिया हा चार महिन्यापासून बेपत्ता असून ...

Married couple missing for four months | चार महिन्यांपासून विवाहित जोडपे बेपत्ता

चार महिन्यांपासून विवाहित जोडपे बेपत्ता

पोलीस आयुक्तांना निवेदन : रिपाइंचे पोलीस पेट्रोल पंपसमोर आंदोलन
अमरावती : संजय गांधी नगरातील रहिवासी सचिन सिमोलिया हा चार महिन्यापासून बेपत्ता असून त्याला शोधण्यास पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात बुधवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने पोलीस पेट्रोल पंपासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले व पोलीस आयुक्तांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
सचिन याने कारंजा लाड येथील रहिवासी शिवानी तुकाराम ढोके हिच्याशी १ एप्रिल २०१६ रोजी आर्य समाज मंदिरात विवाह केला. या विवाहाला मुलीचे वडिल तुकाराम ढोके यांचा विरोध होता. मुलीचे वडिल हे वाशिम जिल्ह्यातील हातेगाव (पूर्णा) येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. लग्न झाल्यानंतर शिवानी ढोकेच्या वडिलांनी मुलीला फे्रजरपुरा ठाण्यात मारहाण केली होती तसेच सचिन सिमोलियाला बघून घेण्याची धमकी दिली होती. याप्रकरणानंतर दोघांचाही सुखी संसार सुरळीत सुरु होता. मात्र, २५ मे रोजी शिवानीला फोन करून माहेरी बोलाविण्यात आले. त्यामुळे सचिन व त्याची पत्नी शिवानी हे दोघेही कारंजा लाड येथे गेलेत. त्यानंतर सचिनसोबत कुटुंबीयांचा संपर्कच नाही. सचिनच्या कुटुंबीयांनी त्याची चार दिवस प्रतीक्षा केली, मात्र, अद्याप सचिन घरी परतला नाही. त्यामुळे ३१ मे रोजी सचिनच्या कुटुंबीयांनी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात सचिन हरविल्याची तक्रार नोंदविली.
या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा सचिनच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. सचिन न परतल्याचे पाहून त्याच्या कुटुंबीयांनी कारजा लाड येथे जाऊन शिवानीच्या घरी चौकशी केली. मात्र तिचे घर बंद असल्याचे आढळून आले.
शिवानीचे वडिल पोलीस विभागात कार्यरत असल्याने फे्रजरपुरा पोलिसांनी मुलीच्या वडिलांना मदत केल्याचा आरोप सचिनच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप सचिनची आई सविता सिमोलिया यांनी केला आहे.
मुलीचे वडिल पोलीस विभागात कार्यरत असल्यानेच या प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे त्यामुळे याप्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करून दोषीवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी व बेपत्ता सचिनचा शोध घेऊन सविता सिमोलिया यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे जिल्हा संघटक अमोल इंगळे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी दिपक सरदार, मनोज वानखडे, सविता भटकर, देविदास मोरे, आतिष डोंगरे, सदिंप गजभिये, अनिल फुलझेले, सविता सिमोलिया, गौतम मोहोड, गणेश तेलगोटे यांच्यासह आदिचा सहभाग होता.

Web Title: Married couple missing for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.