२० लाखांसाठी विवाहितेचा छळ

By Admin | Updated: October 19, 2015 00:31 IST2015-10-19T00:31:31+5:302015-10-19T00:31:31+5:30

रायपूर माहेर असलेल्या विवाहितेचा अमरावती येथे २० लाखांसाठी छळ करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.

Marriage for 20 lakhs marriages | २० लाखांसाठी विवाहितेचा छळ

२० लाखांसाठी विवाहितेचा छळ

अमरावती : रायपूर माहेर असलेल्या विवाहितेचा अमरावती येथे २० लाखांसाठी छळ करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणाची नोंद फे्रजरपुरा पोलिसांनी केली असून प्रकरण रायपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
रायपूर येथील रहिवासी ३० वर्षीय महिलेचा विवाह २३ फेब्रुवारी २०१४ मध्ये स्थानिक सिंधूनगरातील रहिवासी सनी मुलचंदानी नामक युवकाशी झाला. लग्नानंतर पीडितेला माहेरवरून २० लाख रूपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. मात्र, पीडितेने पैसे आणण्यास नकार दिल्यावर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू केले. जीवे मारण्याची धमकीसुध्दा दिली. याबाबत पीडित महिलेने शनिवारी तक्रार दाखल केली असून फे्रजरपुरा पोलिसांनी झिरोची कायमी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सनी मुलचंदानीसह कुटुंबातील पाच सदस्यांविरुध्द भादंविच्या कलम ४९८(अ) नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास फे्रजरपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.जी.सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक लभाने करीत आहेत.
फ्रेजरपुरा पोलिसांनी हे प्रकरण रायपूर पोलिसांच्या सुपूर्द केले असून रायपूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Marriage for 20 lakhs marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.