‘राजकीय भविष्यवाणी’चा बाजार बहरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:31 IST2021-01-13T04:31:27+5:302021-01-13T04:31:27+5:30
पान ३ चे लिड मोहन राऊत धामणगाव रेल्वे : ग्रामपंचायत निवडणुकीला केवळ चार दिवस शिल्लक असल्याने सर्वच गटांचे नेते ...

‘राजकीय भविष्यवाणी’चा बाजार बहरला
पान ३ चे लिड
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : ग्रामपंचायत निवडणुकीला केवळ चार दिवस शिल्लक असल्याने सर्वच गटांचे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. त्याच्या जोडीला राजकीय भविष्यवाणीचा बाजारही बहरला आहे. निवडून येण्यासाठी होमहवन व यज्ञाचा सल्ला दिला जात आहे. यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मोजले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
‘व्हिलेज बॅरिस्टर’ आता अंधश्रद्धेच्या वाटेवर चालू लागत असल्याचे चित्र दिसत आहे. चिन्ह वाटपानंतर प्रचाराला वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रभागात कार्यकर्त्यांची मोठी फौज उभारली असून, काही उमेदवारांनी प्रभागात निवडून येण्यासाठी आता भविष्यवाणीचा आधार घेतला आहे. ग्रहदशा अधिक मजबूत व्हावी म्हणून कुलदैवताची उपासना, होम, यज्ञ, हवन करण्याचे सल्ले ज्योतिषाकडून दिले जात आहेत. त्यासाठी पाच हजार रुपयांपासून तर १५ ते २० हजार रुपयांपर्यंत दक्षिणा घेतली जात आहे.
बॉक्स १
काही उमेदवार एका ज्योतिषावर विश्वास न ठेवता पाच ते सात ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य पाहत आहे. विशेष म्हणजे, विरोधी गटाच्या उमेदवारांची काय कमजोरी आहे, त्यावर प्रहार करण्याची रणनीती काय असावी, याचा शोध घेतला जात आहे. निवडून येण्याकरिता एक ते दोन हजार रुपयांच्या खड्यांचा वापर आपण करावा, असे काही सल्ले काही ज्योतिष उमेदवारांना देत आहेत. परिणामी, अनेक उमेदवारांच्या हातात तांब्याच्या अंगठीत काही नवनवीन खडे पाहायला मिळत आहेत.
-