बाजार समिती अडत्यांच्या पाठीशी नाही

By Admin | Updated: October 21, 2015 00:30 IST2015-10-21T00:30:02+5:302015-10-21T00:30:02+5:30

मेहरबाबा ट्रेडर्सचे धान्य व्यापारी मधुकर गावंडे यांनी बाजार समितीचे अडते सचिन झोपाटे याने ३ लाख ५४ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला.

The market committee is not behind the obstacles | बाजार समिती अडत्यांच्या पाठीशी नाही

बाजार समिती अडत्यांच्या पाठीशी नाही

पत्रपरिषद : सभापती प्रभाकर वाघ यांची माहिती
चांदूररेल्वे : मेहरबाबा ट्रेडर्सचे धान्य व्यापारी मधुकर गावंडे यांनी बाजार समितीचे अडते सचिन झोपाटे याने ३ लाख ५४ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून अंतिम चौकशी अहवाल व निकाल आलेला नाही. त्यामुळे बाजार समिती कोणतीही कारवाई करू शकत नाही. या प्रकरणात बाजार समिती कोणालाही पाठीशी घालत नसून अडत्याला वाचवित नाही, अशा स्पष्ट शब्दांत सभापती प्रभाकर वाघ यांनी बाजार समितीवर लावलेल्या आरोपाचे खंडण केले. आयोजित पत्रकार पषिदेत ते बोलत होते.
यावेळी सभापती प्रभाकर वाघ म्हणाले, धान्य व्यापारी गावंडे व अडते झोपाटे यांच्यातील व्यवहाराचा वाद बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी व प्रशासकाच्या कालावधीत झाला. या व्यवहारात धान्य व्यापारी गावंडे यांनी अडत्याने बोगस बिले दिल्याचा आरोप केला. तसा कुठलाही प्रकार बाजार समितीत झालेला नाही व बोगस बिले दिले गेलेले नाही. उलट धान्य व्यापाऱ्याने बिले हरविले आहे. मेहरबाबा ट्रेडर्सचे मधुकर गावंडे जानेवारी २०१५ पासून बाजार समितीमध्ये व्यापार करीत आहे. अडते व व्यापाऱ्यांच्या व्यवहारात चुका झाल्यास दोघेही एकत्र बसून समस्या सोडवितात, असा प्रकार कधीही बाजार समितीमध्ये झालेला नाही. सुटीच्या दिवशी बाजार समितीमध्ये कोणताही व्यवहार होत नाही. तसे चौकशीमध्ये आढळल्यास दोषींवर कारवाई करू. बाजार समिती कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे सांगितले. पत्रकार परिषदेला उपसभापती अशोकराव चौधरी, सचिव चेतन इंगळे, संचालक प्रवीण घुईखेडकर, हरिभाऊ गवई, प्रदीप वाघ, चांडक उपस्थित होते.

Web Title: The market committee is not behind the obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.