बाजार समितीच्या दोन संचालकांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 00:24 IST2017-03-07T00:24:12+5:302017-03-07T00:24:12+5:30

मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या अंजनगाव बाजार समितीत नाफेड तूर खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा बांध रविवारी फुटला.

The market committee assaulted two directors | बाजार समितीच्या दोन संचालकांना मारहाण

बाजार समितीच्या दोन संचालकांना मारहाण

संभाजी ब्रिगेड आक्रमक : सातबारा शेतकऱ्यांचा, तूर व्यापाऱ्यांची
अंजनगाव सुर्जी : मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या अंजनगाव बाजार समितीत नाफेड तूर खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा बांध रविवारी फुटला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने बाजार समितीच्या दोन संचालकांना चोप दिल्याने बाजार समितीतील तूर खरेदीचा प्रश्न पेटला.
बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या तुरीचे भाव पडल्यानंतर अंजनगाव सुर्जी येथे नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येऊन पाच हजार ५० रुपये शेतकऱ्याच्या तुरीला भाव मिळू लागला. परंतु, काही अवघ्या दिवसात नाफेड खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल तूर येऊन पडल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे वजन व्हायला पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने अधिकारी व कर्मचारी व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून आपल्या मालाचे वजन लवकर करून घेतात, अशी आरडाओरड होवू लागली. तसेच संचालक मंडळातील काही संचालकसुद्धा अंजनगाव बाजार समितीत तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून कमी दराने तर खरेदी करून नाफेडमध्ये तूर विकत असल्याची ओरड मागील एक महिन्यापासून होत असताना सचिव व प्रशासक, संचालक मंडळाच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप होत असताना चक्काजाम आंदोलन, निवेदने असे प्रकार चालू असताना तूर खरेदी केंद्रावर कोणत्याही सुधारणा न झाल्याने अखेर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सचिन नवघरे यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी बोलणी सुरू असताना बाजार समितीचे संचालक अरुण खारोडे, नंदकिशोर काळे हे आंदोलन शांत करण्यास गेले असता त्यांच्यात बाचाबाची होऊन संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संचालकांना चोप दिला. त्यानंतर पोलिसांना पाचरण करावे लागले. तसेच तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी बाजार समितीत उपस्थित झाले. त्यानंतर संभाजी ब्रिगेड व सचिव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बाजार समितीच्या प्रत्येक गेटवर चोवीस तास शेतमाल पाहून शेतकऱ्यांना टोकण देण्यात येईल, तसेच सीसीटीव्ही कॅमेरा तीन दिवसात सुरू करण्यात येईल, व्यापारी, अडते, संचालक यांनी प्रमाणाबाहेर नाफेड शासकीय खरेदी केंद्रावर विक्री केल्या असल्यास त्यांच्यावर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल, ही आश्वासने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यामध्ये विनोद हागोणे, सोपान साबळे, पे्रमकुमार बोके, सागर बोबडे, उमेश काकड उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The market committee assaulted two directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.