विवाहिते शारीरिक, मानसिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST2021-09-11T04:15:12+5:302021-09-11T04:15:12+5:30

पँटच्या खिशातून १२६० रुपये चोरले अंजनगाव सुर्जी : पँटच्या खिशातून १२६० रुपये काढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरडा-ओरड केली ...

Marital physical, mental abuse | विवाहिते शारीरिक, मानसिक छळ

विवाहिते शारीरिक, मानसिक छळ

पँटच्या खिशातून १२६० रुपये चोरले

अंजनगाव सुर्जी : पँटच्या खिशातून १२६० रुपये काढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरडा-ओरड केली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अनिल पंजाबराव सतपाळ (रा. वीर सावरकरनगर जवळा खु. जि. बुलडाणा) यांच्या तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी आरोपी विशाल आनंदा तायडे (रा. ग्रामसेवक कॉलनी मूर्तिजापूर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

जागेच्या वादातून धारदार शस्त्राने वार

अंजनगाव सुर्जी : घराजवळ गाडी उभी केल्यावरून वाद करून गालावर धारदार शस्त्राने मारून जखमी केल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी घडली. तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी आरोपी शुभम श्रीकृष्णविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------

भांडणात मध्यस्थीला घेतला चावा

ब्राम्हणवाडा थडी : पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमाच्या गालाला व उजव्या हाताला चावा घेऊन जखमी केल्याची घटना रेडवा येथे ८ सप्टेंबर रोजी घडली. प्रेमा जाधव यांच्या तक्रारीवरून माखन राठोड विरुद्ध स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Marital physical, mental abuse