-तर रिपाइंद्वारे मराठा आरक्षणाचे समर्थन
By Admin | Updated: September 26, 2016 00:40 IST2016-09-26T00:40:46+5:302016-09-26T00:40:46+5:30
खडोपाडी असेली मराठा तरूण-तरूणींच्या आर्थिक, शैक्षणिक बाबींकडे पाहिले असता त्यांची स्थिती आज अतिशय बिकट आहे.

-तर रिपाइंद्वारे मराठा आरक्षणाचे समर्थन
प्रताप अभ्यंकर : कार्यकर्ता मेळाव्यात चर्चा
परतवाडा : खडोपाडी असेली मराठा तरूण-तरूणींच्या आर्थिक, शैक्षणिक बाबींकडे पाहिले असता त्यांची स्थिती आज अतिशय बिकट आहे. त्यामुळे आरक्षणाची मागणी करणे हा त्यांचा संवैधानिक अधिकार आहे. फक्त मराठ्यांना आरक्षण देताना एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण अबाधित ठेवावे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला रिपाइंचे समर्थ आहे, असा ठराव शनिवारी येथे आयोजित रिपाइंच्या बैठकीत घेण्यात आला.
नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर विचार विमर्ष करण्याकरिता अचलपूर तालुका रिपाइंच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेंद्र गवई, रामेश्वर अभ्यंकर, भूषण बनसोड, प्रताप अभ्यंकर, विश्वास गवई, आनंद गायकवाड, किशोर मोहोड प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राज्यभर निघालेल्या मराठ्यांच्या मूकमोर्चाच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला. त्यावेळी हा ठराव घेण्यात आला. अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये दुरूस्त करण्याच्या मागणीबद्दल बोलताना प्रताप अभ्यंकर म्हणाले, अॅट्रॉसिटी अॅक्ट हा कायदा मागासवर्गीयांच्या संरक्षणासाठी आहे.
यात दुरूस्ती केल्यास त्याची धार बोथट होईल. त्यामुळे या कायद्याचा दुरूपयोग टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यात राजेंद्र गवई यांनी प्रताप अभ्यंकर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. युतीबाबत बोलताना स्थानिक सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक आनंद गायकवाड, संचालन प्रभाकर मोहोड यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)