अमरावतीच्या युवकाची मराठी चित्रपटात भरारी
By Admin | Updated: March 11, 2015 00:23 IST2015-03-11T00:23:22+5:302015-03-11T00:23:22+5:30
गरीब परिस्थीतीला लढ देत अमरावतीच्या प्रफूल्ल जोशीने मराठी चित्रपटात उंच्च भरारी घेतली आहे.

अमरावतीच्या युवकाची मराठी चित्रपटात भरारी
अमरावती : गरीब परिस्थीतीला लढ देत अमरावतीच्या प्रफूल्ल जोशीने मराठी चित्रपटात उंच्च भरारी घेतली आहे. काही दिवसापुर्वी चित्रपट गृहामध्ये गाजलेल्या रझाकार चित्रपटात उत्कृष्ट अभिवन करुन प्रफुलने अमरावतीचे नाव लौकिक केले आहे.
स्थानिक देशपांडे प्लॉट येथील रहिवासी प्रफुल्ल जोशी दोन वर्षांचा असतानाच वडिलांचे निधन झाले, तेव्हापासून आईनेच साभांळ केला. सुंदर व देखणा दिसणाऱ्या प्रफुल्लला चित्रपट सृष्ट्रीत पाठविण्याची त्यांच्या आईला वाटत होते. शालेय जीवनापासूनच चित्रपटाची आवड असणाऱ्या प्रफुल्लने पुर्वी नाटकामध्ये काम करुन अभिनय सादर केले. शहरातील भारतीय महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर प्रफुल्ल जोशीने चित्रपट सृष्ट्रीत भवितव्य घडविण्यासाठी २००५ मध्ये मुंबई गाठली होती. चित्रपट सृष्ट्रीत पाऊल टाकताच मुंबईतील जीवनाचे त्यांने अनेक कटु अनुभव घेतले. ध्येय गाठण्याची धडपड करित प्रफुलने चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. सतत नऊ वर्ष संघर्ष करुन त्याला आता चित्रपट सृष्ट्रीत वाव मिळाली आहे.