‘वैचारिक क्रांती घडविण्यात मराठा सेवा संघ अग्रेसर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:16 IST2021-09-07T04:16:41+5:302021-09-07T04:16:41+5:30

३१ वा वर्धापन दिन धामणगाव रेल्वे : मराठा सेवा संघाने ३१ वर्षांमध्ये वैचारिक क्रांती घडवून आणली असल्याचे मत विलास ...

‘Maratha Seva Sangh Leading in Ideological Revolution’ | ‘वैचारिक क्रांती घडविण्यात मराठा सेवा संघ अग्रेसर’

‘वैचारिक क्रांती घडविण्यात मराठा सेवा संघ अग्रेसर’

३१ वा वर्धापन दिन

धामणगाव रेल्वे : मराठा सेवा संघाने ३१ वर्षांमध्ये वैचारिक क्रांती घडवून आणली असल्याचे मत विलास जाधव यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाला ३१ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विलास बीरे यांच्या निवासस्थानी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास जाधव होते. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून बहुजनांचा खरा इतिहास मांडण्यात आला आहे, असे जाधव म्हणाले. मराठा सेवा संघाच्या आतापर्यंत विकासात्मक कार्याचा आढावा विलास बीरे यांनी भाषणातून मांडला. यावेळी नंदकुमार मानकर, सुधीर शेळके, मनोज हांडे, प्रदीप मानकर, विजय दुधाट, राजाभाऊ पाळेकर, गजानन भेंडे, राम बायस्कर, संदीप पावडे, मंगला दुधाट, शेळके, हांडे यांची उपस्थिती होती.

Web Title: ‘Maratha Seva Sangh Leading in Ideological Revolution’