एक मराठा, लाख मराठा !

By Admin | Updated: September 10, 2016 00:14 IST2016-09-10T00:14:49+5:302016-09-10T00:14:49+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १३ जुलैला घडलेल्या नृशंस घटनेतील पिडीतेच्या कुटुंबास त्वरीत न्याय मिळावा आणि या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी...

Maratha, a million Maratha! | एक मराठा, लाख मराठा !

एक मराठा, लाख मराठा !

पूर्व तयारी वेगात : रविवारी नियोजन बैठक
अमरावती : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १३ जुलैला घडलेल्या नृशंस घटनेतील पिडीतेच्या कुटुंबास त्वरीत न्याय मिळावा आणि या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी २२ सप्टेंबरला मराठे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.हा मराठा क्र ांती मुक मोर्चा नेहरु मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच करेल.
जिल्ह्यातील सकल मराठा समाजबांधवांनी अत्यंत शिस्तबध्दपणे मराठा क्रांती मुक मोर्चाची हाक दिली आहे.या मोर्चाला जिल्ह्यातून येणारा मराठा बांधव समाजाचे अन्य प्रश्न आणि अडचणी प्रशासनासमोर मांडणार आहे.या मोर्चात तरुण,महिला,उद्योजक,शेतकरी,नोकरदार,व्यावसायीक,कामगार ,सामाजिक राजकीय कार्यकर्ते सहभागी होणार आहे.एक मराठा- लाख मराठा अशी हाक मराठा बांधवांनी दिली आहे.समाज माध्यमातून या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे.हा मोर्चा कुठल्याही धर्म वा जातीविरोधात नाही.समाजविघातक प्रवृत्तींना ठेचण्यासाठी या मोर्चाचे आयोजन असून ११ सप्टेबरला सकाळी ११ वाजता नियोजन सभा होणार आहे.जुन्या बायपास रोडवरील मनोर मांगल्य येथे ही नियोजन बैठक होईल.या नियोजन बैठकीस मराठा समाजबांधवांनी कुटुंबियासह उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मुक मोर्चाच्या आयोजन समितीच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.उल्लेखनिय म्हणजे मराठा समाज बांधवाच्या या मोर्चाला कुठल्याही राजकीय वा अराजकीय चेहऱ्याचे नेतृत्व नाही.मराठा हाच एक चेहरा राहणार आहे. त्यादुष्टीने पूर्व तयारीने वेग घेतला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Maratha, a million Maratha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.