चाचणीविना अनेक वाहनांना मिळतात परवाने

By Admin | Updated: July 8, 2016 00:14 IST2016-07-08T00:14:01+5:302016-07-08T00:14:01+5:30

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालराज कायम आहे. सोमवारी त्यांनी आरटीओ कार्यालयात धुमाकूळ घातला.

Many vehicles get licenses without testing | चाचणीविना अनेक वाहनांना मिळतात परवाने

चाचणीविना अनेक वाहनांना मिळतात परवाने

दलालराज कायम : ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकांचे, साटेलोटे
संदीप मानकर अमरावती
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालराज कायम आहे. सोमवारी त्यांनी आरटीओ कार्यालयात धुमाकूळ घातला. अधिकाऱ्यांचे व ड्रायव्हींग स्कूलच्या संचालकांचे साटेलोटे असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचा परवाना काढायचा असेल तर त्याची ट्रायल न होताच परवाने दिले जात आहेत.
दलालांना येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय आहे. अतिरिक्त पैसे घेतल्याशिवाय ते काम करीत नाहीत. विविध दलालांची परवाना काढून देण्याचे वेगवेगळे रेट आहेत. नियमाने शिकाऊ परवाना दिल्यानंतर त्याला एक महिन्यात परवाना मिळतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना परवाना देण्याआधी त्याला वाहतुकीचे नियम माहीत आहे की, नाही त्याला दुचाकी व चारचाकी वाहन नीट चालवता येते की नाही याची मोटर वाहन निरीक्षक ट्रायल घेतात. त्यासाठी अनेक नागरिकांना व विद्यार्थ्यांना आरटीओच्या पायऱ्या झिझवाव्या लागतात. नियमाने कधी-कधी अपोर्टंमेट जास्त असेल तर दिवसभर थांबवावे लागते. त्यामुळे दलालांना पैसे देऊन ट्रायल न करताच आपल्याला परवाना मिळाला तर बरे होऊल असे नागरिकच दलालांना विंनती करतात, त्यामुळे तगळे दर आकारण्यात येतात साहेब आपले ओळखीचे आहे. फक्त कागदपत्रे व पैसे द्या, काम होऊन जाईल, असे दलालांच्यावतीने नागरिकांना हमी दिली जाते. यातून महिन्याकाठी लाखो रुपये उखळण्याचा गौरखधंदाच त्यांनी थाटला आहे. मोटर वाहन निरीक्षक, सह.मोटर वाहन निरीक्षकही नियमात आलेल्या नागरिकांचे काम लवकर होत नाही. त्याला विविध कागतपत्रांची पूर्तता करण्याची अट घालतात मात्र कुठल्याही दलालांच्या कागतपत्रानवर त्वरित स्वाक्षरी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी अश्या दलालांवर कारवार्इंचा बळगा उगारला होता.

तो खडसे दलाल कोण ?
येथे 'लोकमत'चे प्रतिनिधी शिकाऊ परवाना व इतर वाहनांचा परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेले. तेथे ते एका खडसे नामक दलाला भेटले असता शिकाऊ परवाना काढण्याचे ४०० रुपय तर दुचाकी व चारचाकी वाहनांचा परवाना सोबत काढायचे असेल तर २,२०० रुपये पडतात. महिनाभरात काढून देऊ, असे सांगण्यात आले. हा दलाल कार्यालयात व कार्यालयाबाहेर ग्राहक शोधत फिरत होता. हा आतमध्ये शिरतोच कसा व अधिकारी त्याचे काम का करतात, असा प्रश्न येथे आलेल्या सामान्य नागरिकांना पडला आहे.

आरटीओच्या प्रवेशव्दारावरच दलालराज
आरटीओ कार्यालयाच्या बाहेरील प्रवेशव्दाराजवळच दलालराज सुरू आहे. नागरिक कार्यालयात शिरण्यापूर्वीच त्याला या दलालांकडून काम विचारण्यात येते.
याच ठिकाणी राजरोसपणे पैशाची देवाणघेवाण करण्यात येते. येथेच सर्वांच्यासमोर कागतपत्रे स्वीकारली जातात. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या डोळयांदेखत सुरू असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी डोळे मिटून का बसले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: Many vehicles get licenses without testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.