एसडीओंच्या ‘त्या’ पेटीत बरेच काही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:19 IST2018-01-06T23:19:04+5:302018-01-06T23:19:39+5:30

अचलपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्या कस्टडीत असलेल्या दोन पेट्यांमध्ये मौल्यवान वस्तू पडून आहेत.

Many of the 'those' box in the SDOs! | एसडीओंच्या ‘त्या’ पेटीत बरेच काही !

एसडीओंच्या ‘त्या’ पेटीत बरेच काही !

ठळक मुद्देसोन्याच्या कड्यासह मौल्यवान वस्तू : २७ वर्षांपासून बंद अवस्थेत, कुतूहल वाढले

अनिल कडू।
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : अचलपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्या कस्टडीत असलेल्या दोन पेट्यांमध्ये मौल्यवान वस्तू पडून आहेत. या मौल्यवान वस्तू जवळपास दीडशे वर्षांर्हून अधिक जुन्या आहेत. यात सोन्याचे कडे, पोत, आणि पुरातन नाण्यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या या मौल्यवान वस्तूंची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. या पेट्यांमध्ये मोगलांसह इंग्रजकालीन बरेच काही आढळून येण्याची शक्यता आहे.
अचलपूर एसडीओंच्या नावे असलेल्या या दोन पेट्या अचलपूर कोषागार कार्यालयात आहेत. या पेट्यांची मालकी अचलपूर एसडीओ यांच्याकडेच आहे. दर तीन वर्षांनी एसडीओ या पेट्या उघडतील, पाहणी करतील व त्याची नोंद घेतील, असा नियम आहे. मात्र, प्रत्यक्षात या पेट्या मागील २७ वर्षांत कुणी उघडल्याच नाहीत. २७ वर्षांनंतर तत्कालीन एसडीओ म्हस्के यांनी या पेट्या उघडल्यात. त्यांनी पाहणी करून नोंदी घेतल्या. अन् पेट्या परत कुलूपबंद केल्यात. या पेट्यांमध्ये त्यांना नेमके काय आढळून आले याची माहिती बाहेर आली नाही. दुसरीकडे कोषागारात असलेल्या या पेट्या एसडीओंच्या असल्यामुळे कोषागार अधिकारी त्याला हातही लावत नाहीत. केवळ सुरक्षेची जबाबदारी ते स्वीकारून आहेत. या पेट्या उघडण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. केवळ मौल्यवान वस्तू असलेल्या पेट्याा म्हणूनच ते त्याकडे बघतात. त्या पेट्या आणखी किती दिवस बंदच राहतील, असा प्रश्न पडला आहे.
- तर होईल उलगडा
तत्कालीन एसडीओ म्हसके यांच्या नंतर आता अचलपूर एसडीओ डॉ. व्यंकट राठोड यांच्याकडे या पेट्या उघडण्याची जबाबदारी आहे. पण याकरिता त्यांना तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याची वाट बघावी लागणार आहे. राठोड यांनी या पेट्या उघडल्यानंतरच पेटीतील मौल्यवान वस्तूंचा उलगडा होऊ शकेल आणि रिझर्व्ह बँकेकडे त्या वस्तू जमा करण्याचा मार्ग मोकळा होईल.
त्यात असावे तरी काय?
पेटीत असलेल्या मौल्यवान वस्तूंच्या विवरणासह नोंद असलेले नोंद रजिस्टर उपलब्ध नाही. केवळ एक कार्यालयीन टिपण्णी आहे. या टिप्पणीवरच पेटी उघडली जाते. वस्तू बघितल्याची नोंद अचलपूर एसडीओ घेतात. इंग्रजी राजवटीत अचलपूर हा जिल्हा होता. जिल्ह्याचे मुख्यालय अचलपूरला होते. तत्कालीन इंग्रज आधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मौल्यवान वस्तू या पेट्यांमध्ये असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अनेक एसडीओंनी पेट्या उघडल्याच नाही
प्रत्यक्षात या मौल्यवान वस्तू तत्कालीन अधिकार्यांनी तेव्हाच रिजर्वबँकेकडे जमा करायला हव्या होत्या . पण त्या अजूनही अचलपूर मध्येच दोन पेट्यांमध्ये मध्ये पडून आहेत. दर तीन वर्षांनी पेटी उघडण्याचा, मौल्यवान वस्तू बघून नोंदी घेण्याचा दंडक असतानाही अचलपूर मधून बदलून गेलेल्या अनेक एसडीओनी त्यांच्या कार्यकालात याची दखलही घेतली नाही. किंबहुना अधिनस्त यंत्रनेने त्यांना याची कल्पनाच दिली नाही .

Web Title: Many of the 'those' box in the SDOs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.