फिजिओथेरपीकडे वाढतोय अनेकांचा ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST2021-09-08T04:17:49+5:302021-09-08T04:17:49+5:30
जागतिक फिजिओथेरपी दिन ८ सप्टेंबर रोजी असतो. फिजिओथेरपी हे विज्ञानावर आधारित उपचार पद्धत आहे. यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन ...

फिजिओथेरपीकडे वाढतोय अनेकांचा ओढा
जागतिक फिजिओथेरपी दिन ८ सप्टेंबर रोजी असतो. फिजिओथेरपी हे विज्ञानावर आधारित उपचार पद्धत आहे. यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन शरीर तंदुरुस्त आणि ताजे व्हायला लागतात. सद्यस्थितीत अंगमेहनीचे काम नसून बैठकीची कामे अधिक प्रमाणात करावी लागत असल्याने शरीराची हालचाल कमी होते. त्यात कोरोनापासून अनेकांची कामाची पद्धतच बदलल्याने ही समस्या अधिकच वाढली आहे. त्यामुळे अनेकांना फिजिओथेरपी करण्याची वेळ आली आहे. शहरात ८ फिजिओथेरपी सेंटर असून तेथे अनेक जण उपचार घेत आहेत. यामध्ये व्यायाम, संयुक्त मोबिलायझेशनसह अनेक प्रकारे उपचार केला जातो. यामध्ये आबावृद्धांना उपचार घेता येते. स्पॉंडिलायसिस, पॅरालिसिस, सांधेदुखी, मश्तिष्क शस्त्रक्रिया, छातीची शस्त्रक्रिया, लिगामेंट शस्त्रक्रिया, हाडाच्या शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी अत्यंत उपयुक्त मानली जाते. कोरोनानंतर धाप लागणे, मुलांचे पाय सरळ न होणे, वृद्धांचे संतुलन जाणे, कामाचा थकवा वाटणे, महिलांना मासिक पाळीत त्रास होणे, गर्भ पिशवी काढल्यानंतर, गर्भधारणेपूर्वी व नंतरही फिजिओथेरपी उपयुक्त ठरते, अशी न्यूरोसायन्स पुणे डॉ. मृणाल हरले-वाघमारे यांनी दिली. बॉक्स
फिजिओथेरपी म्हणजे काय?फिजिओथेरपी हा एक आरोग्य सेवा व्यवसाय आहे. ज्यांना त्यांची शक्ती, कार्य, हालचाल आणि एकूणच कल्याण पुनर्संचयि, देखभाल आणि जास्तीत जास्त करण्यात मदत करतो. फिजिओथेरपी आणि फिजिकल थेरपी या शब्दाचा एक अर्थ आहे. फिजिओथेरपिस्टना शरीर कार्य कसे करते याचे सखोल ज्ञान आहे. आजार, दुखापत आणि अपंगात्वाच्या लक्षणांचे मूल्यांकन, निदान आणि उपचार करण्यासाठी विशेष क्लिनिककल कौशल्य आहे. फिजिओथेरपीमध्ये पुवर्वसन व दुखापतीपासून बचाव आणि आरोग्य व तंदुरुस्तीचा समावेश आहे.
महत्त्व
फिजिओथेरपी केल्याने शरीर मजबूत आणि अधिक लवचिक बनविते. हालचाली आणि गतिशीलता स्वातंत्र्य वाढविते. सोपे श्वास घेण्यास मदत होते. शारीरिक वेदना कमी होते. सक्रियता राहते. दुखापत टाळण्यास मदत होते.
कोट
कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी करावीच लागते. अलीकडे मनक्याचा अनेकांना वाढला वाढला. त्यावर विनाऑपरेशन फिजिओथेरपी हा उत्तम उपाय मानला जातो. त्यामुळे बरेच नागरिक फिजिओथेरपीकडे वळल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. अभिजित कांबळे, अध्यक्ष, फिजिओथेरपी असोसिएशन अमरावती