वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांसमवेत मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:16 IST2018-01-07T23:15:44+5:302018-01-07T23:16:04+5:30
वनविभागात ‘वरिष्ठ तुपाशी, कनिष्ठ उपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली असून ती बदलविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने एग्लार पुकारला.

वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांसमवेत मंथन
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वनविभागात ‘वरिष्ठ तुपाशी, कनिष्ठ उपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली असून ती बदलविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने एग्लार पुकारला. वनकर्मचाºयांच्या समस्या, प्रश्न त्वरेने सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देत पदाधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षकांसोबत मंथन बैठक घेतली.
मुख्यवनसंरक्षक प्रवीण चव्हाण, व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्याशी झालेल्या मंथन बैठकीत आंतरवृत्तीय वनपाल बदली, मासिक वेतन, ज्येष्ठता यादी अद्ययावत करणे, सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत मिळावी, निवासस्थानाची समस्या दूर व्हावी, गोपनीय अहवाल मिळावा, वनकर्मचाऱ्यांना ओळखपत्र मिळावे, वेतन पळताळणी करावी, पदोन्नतीतील त्रृट्या दूर व्हाव्यात, कालबद्ध पदोन्नती मिळावी, वनकर्मचाऱ्यांना हल्ल्यांतून संरक्षण मिळावे, वनमजुरांना पात्रतेनुसार सामावून घ्यावे, सेवानिवृत्ती निश्चित करावी, सामाजिक वनीकरणात कामाचे क्षेत्र निश्चित करावे, वनरक्षक चेतन लवटे यांच्या मृत्युबाबत लाभाचा आढावा घ्यावा, व्याघ्र प्रकल्पात रेशन भत्ता मिळावा, वनकल्याण निधी देण्यात यावा, वनकर्मचाºयाच्या संघटनांनी सादर केलेल्या समस्या, प्रश्न तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील, सुधीर हाते, माधव मानमोडे, विजय युवरेकर, बापुराव गायकवाड, सुधीर आगरकर, विवेश पाथ्रीकर, विजय शिंदे, विनोद ढवळे, सैय्यद करीम, मधुकर रेचे, विनोद निर्मळ, देविदास कास्देकर, एम.बी. खान आदी उपस्थित होते.