मनोहर जाधव यांचे अकाली निधन
By Admin | Updated: January 10, 2017 00:09 IST2017-01-10T00:09:29+5:302017-01-10T00:09:29+5:30
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर शंकरराव जाधव यांचे रविवारी रात्री ७.४५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

मनोहर जाधव यांचे अकाली निधन
परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर शंकरराव जाधव यांचे रविवारी रात्री ७.४५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. सोमवारी दुपारी १२.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
रविवारी सायंकाळी बहिरम येथे आयोजित भागवत सप्ताहाच्या सांगता समारोहाच्यानिमित्ताने महाप्रसादाचे किराणा साहित्य नेताना मनोहर जाधव यांना कोठारा गावानजीक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना परतवाडा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. परसापूर येथील अनुदानित आश्रमसाळेत मुख्याध्यापक पदासोबतच मल्हारा ग्रामपंचायतीचे सरपंच, बाजार समिती संचालक, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष यांसह विविध पदांवर कार्य करणारे मनोहर जाधव वयाच्या ४२ ्व्या वर्षी राजकारणात आले.
समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व
परतवाडा : निधनामुळे मल्हारा, गोलटकी, परतवाडा, अचलपूर परिसरात शोककळा पसरली हे. त्यांच्या पश्चात एकुलता एक मुलगा हर्षवर्धन याचेसह पत्नी, आई-वडिल व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत खा. आनंदराव अडसूळ, मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल, जि.प. सदस्य प्रताप अभ्यंकर यांच्यासह अनेक गणमान्य सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)