‘एसटी ’मराठीचा वापर सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:59+5:302021-02-05T05:24:59+5:30

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाचे कार्यालयीन कामकाज मराठी भाषेत करण्याची सक्ती असतानाही काही जण टाळाटाळ करतात. अशा अधिकारी, कर्मचार्‍यांवर ...

Mandatory use of ‘ST’ Marathi | ‘एसटी ’मराठीचा वापर सक्ती

‘एसटी ’मराठीचा वापर सक्ती

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाचे कार्यालयीन कामकाज मराठी भाषेत करण्याची सक्ती असतानाही काही जण टाळाटाळ करतात. अशा अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाईचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून धडकले आहेत.

कार्यालयीन नोंद, पत्रव्यवहार करताना इंग्लिश शब्द लिहिल्यास प्रत्येक शब्दामागे शंभर रुपये दंड आकारण्याचे या आदेशात नमूद केले आहे. या कारवाईची नोंद संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेत आणि गोपनीय अहवालात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने १ मे १९६६ पासुन वर्जित प्रयोजने वगळता सर्व काम मराठीतून करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार एसटी महामंडळानेदेखील सूचना केली. परंतु, त्यानंतरही काम शंभर टक्के मराठीत होत नसल्याचे काही ठिकाणी आढळून आले आहे. त्यामुळे नुकतेच विभाग नियंत्रकांना नव्याने आदेश देत मराठीत काम न करणाऱ्यांवर कारवाई करायला सांगण्यात आले आहे. संयुक्तिक कारण नसतानाही मराठीत कामात टाळाटाळ करणाऱ्यांना लिखित गोपनीय अहवालात नोंद तसेच एका वर्षाकरिता बढती किंवा पुढे एका वर्षाकरिता वेतनवाढ रोखणे ही शिक्षा देण्याची सूचना केली आहे.

कोट

विभागीय कार्यालयासह आगारांमध्ये शंभर टक्के मराठीतून कामकाज केले जात आहे. यामध्ये आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास नियमानुसार कारवाई केली जाते. याकरीता एका अधिकाऱ्यांची नियुक्तीसुद्धा केली आहे.

- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक

Web Title: Mandatory use of ‘ST’ Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.