मनोरुग्ण शकुंतला इर्विनमधून बेपत्ता

By Admin | Updated: February 15, 2015 00:13 IST2015-02-15T00:13:10+5:302015-02-15T00:13:10+5:30

येथील मनोरुग्ण शकुंतला आत्माराम इंगोले वय ५५ हिला २४ डिसेंबर २०१४ रोजी अमरावती येथील इर्विन हॉस्पीटल मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात अले.

Manakrishna Shakuntala missing from Irwin | मनोरुग्ण शकुंतला इर्विनमधून बेपत्ता

मनोरुग्ण शकुंतला इर्विनमधून बेपत्ता

मनीष कहाते वाढोणा रामनाथ
येथील मनोरुग्ण शकुंतला आत्माराम इंगोले वय ५५ हिला २४ डिसेंबर २०१४ रोजी अमरावती येथील इर्विन हॉस्पीटल मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात अले. परंतु इर्विन हॉस्पीटल ने ६ जानेवारी २०१५ रोजी नागपूर स्थित जी.एम.सी. रुग्णालयात पुढील उपचाराकरिता रेफर केले. मात्र जी.एम.सी. रुग्णालयात नातेवाईकांनी चौकशी केली असता शकुंतला नावाचे कोणतेही रुग्ण नसल्याचे सांगितले. त्यामुळे कुठे गेली? याची तक्रार सिटी कोतवाली पोलिस स्टेशन ला करण्यात आली आहे.
येथील शिक्षिका शकुंतला इंगोले ही गेल्या अनेक वर्षापासून मनोरुग्ण अहे. तिला नागपूर आणि अमरावती येथील विविध रुग्णालयात उपचार सुरु होते. संपूर्ण गावात ती वेड्यासारखी फिरत होती. अशातच तिच्या पायाला कुत्रा चावला त्यामधुन किडे पडून दुर्गंधी येत होती. म्हणुन नातेवाईक आणि गावकऱ्यांनी तिला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने इर्विन रुग्णालयात उपचार करण्याकरिता दाखल केले. परंतु शकुंतला उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तिला नागपूर स्थित जी.एम.सी. रुग्णालयात पुढील उपचारा करिता इर्विन हॉस्पीटलने दाखल केले. इर्विन हॉस्पीटलच्या रुग्णवाहिकेने शकुंतलाला नागपूरकडे नेत असताना वाटेत कारंजा ते तळेगाव मार्गावर रुग्णवाहिगकाच्या कर्मचारी अणि चालकाने जंगलात उतरुन दिल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळाली. ती आता कुठे आहे याचा शोेध गावकरी घेत आहे.
शकुंतलाचा शोध घेण्याकरिता तिचे नातेवाईक आणि गावातील मंडळी महेंद्र माटोडे, दिलीप शिोगोले, गौतम कुळकर्णी, प्रवीण तांबट, दिपक शहाडे, दिपक उकंडे, सतीश येवले, गुलाब माळीक, नितिन जकवार, विलास माळीक, चेतन माटोडे, विनोद चौधरी, संजय माटोडे, अनिल कोपरकर यांच्या सहीनिशी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शकुंतलेचा शोध घेण्यासंबंधी तक्रार दिली. मात्र पोलीस स्टेशनने अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई केली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे इर्विन हॉस्पिटलचा ६ जानेवारी रोजीची संदर्भचिठ्ठीसुध्दा जीएमसी रुग्णलयाच्या नावाने दिली होती. मात्र शकुंतला संबंधीत रुग्णालयात पोहचलीच नाही.

Web Title: Manakrishna Shakuntala missing from Irwin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.