शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची भ्रमंती वाढली, मानवासाठी धोकादायक?

By गणेश वासनिक | Updated: December 15, 2022 18:42 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ३५ ते ४० वाघांचे आवागमन; बोर, टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचे जंगलक्षेत्रात वास्तव्य

अमरावती : राज्यात सर्वाधिक वाघ हे विदर्भात आहेत. मात्र, आता व्याघ्र प्रकल्पातील वाघांना क्षेत्र कमी पडत असून, ताडोबा-अंधारी, बोर, टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचे ‘आउटगोईंग’ सुरू झाले आहे. त्यामुळे यवतमाळ, पांढरकवडा, वणी, नागपूर, वर्धा, अमरावतीच्या जंगलात वाघांची भ्रमंती ही मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी मानली जात आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यात पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री अभयारण्य आहे. अलीकडे नांदेड, किनवट, पांढरकवडा, वणी या भागातही वाघांची भ्रमंती होत असल्याने भविष्यात या परिसरात मानव-वन्यजीव संषर्घ होण्याची दाट शक्यता आहे. पैनगंगा (किनवट), टिपेश्वर (पांढरकवडा), ताडोबा-अंधारी (चंद्रपूर) असा वाघांचा भ्रमंती मार्ग असल्याचे वन्यजीव विभागाने अधोरेखित केले आहे.

नव्या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरीची प्रतीक्षा वाघांचे कॉरिडॉर हे जागतिक वन्यजीव अनुदान संस्थेकडून मंजूर करण्यात येते. त्यानंतर वाघांच्या कॉरिडॉर व्यवस्थापनासाठी ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून अनुदान प्राप्त होते. त्यानुसार विदर्भ-मराठवाडा असा वाघांचा नव्या कॉरिडॉरचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच ताडोबा- अंधारी, टिपेश्वर, काटेपूर्णा, पैनगंगा या चार अभयारण्य कॉरिडॉरच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघ मध्य प्रदेशात मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा दऱ्या-खोऱ्यांत वसलेला असून जंगल वैभवसंपन्न आहे. तथापि, येथील वाघ हे मध्य प्रदेशातील खरगौन जंगलापर्यंत आवागमन करतात. रानगवा, काळवीट, हरीण, रानडुक्कर या वन्यजीवांची शिकार करून वाघ उपजीविका भागवितो. मेळघाटात ३० ते ४० वाघ असल्याची नोंद आहे. दऱ्या, खोऱ्यांच्या जंगलामुळे वाघ हे क्वचितच व्याघ्र प्रकल्पाबाहेर पडतात. मात्र, लगतच्या मध्य प्रदेशात वाघांचे आवागमन होत असल्याची माहिती आहे.

व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांचे आवागमन वाढले हे खरे आहे. पण ते मानवासाठी धोकादायक ठरताहेत असे म्हणता येणार नाही. किंबहुना एखाद्या वाघाने मनुष्यावर हल्ला केला, असा अहवाल विभागीय वन कार्यालयातून प्राप्त झाल्यास त्याला नियमानुसार रेस्क्यू पथकाद्वारे जेरबंद करण्यात येते. वाघांच्या नव्या कॉरिडॉरला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’कडून मंजुरी मिळविली जाते.

- महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नागपूर

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभागTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पwildlifeवन्यजीवVidarbhaविदर्भ