शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

बलात्कारानंतर म्हणाला, वाच्यता केल्यास ३५ तुकडे करेन; 'ते' फोटो केले व्हायरल

By प्रदीप भाकरे | Updated: June 20, 2023 16:04 IST

आरोपी गुजरातचा, एफबीवर फेक अकाउंट

अमरावती : लग्न करण्याचे आमिष दाखवून एका तरूणीचे वारंवाार लैंगिक शोषण करण्यात आले. मात्र, आरोपीचे खरे रूप कळताच तिने त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिचे अंतरंगाचे फोटो सोशल व्हायरल केले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने प्रकरणाची वाच्यता केल्यास तिचे ३५ तुकडे करण्याची धमकी चक्क फेसबुकहून दिली. याप्रकरणी पिडिताच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी १७ जून रोजी रात्री आरोपी मयूर रामधन गाडेराव (रा. अहमदाबाद, गुजरात) याच्याविरूद्ध बलात्कार व बदनामीचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, आरोपी मयूर व विवाहित २८ वर्षीय पिडिताची सन २०१८ पासून ओळख होती. पिडिताची पतीसोबत काैटुंबिक छळाची केस सुरू असताना त्यांच्यात प्रेमसंबंध देखील जुळले. त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये तिचेवर अमरावती येथील एका गेस्ट हाऊसमध्ये वारंवार बलात्कार केला. त्यानंतर देखील सन २०२० पर्यंत त्यांच्यात संवाद होता. मात्र, पुढे त्याने लग्न करण्यास नकार दिला.

दरम्यान १२ ऑगस्ट २०२२ रोजी मयुरने फेसबुकवर रियान शर्मा नावाने फेक अकाउंट तयार करून पिडिताला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर तो खोटे नाव सांगून तिच्याशी बोलत राहिला. मात्र तो आपला जुना प्रियकर मयुरच आहे, असे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तू खोटे अकाउंट बनविले, असे तिने त्याला बजावले. त्यावर माझ्याकडून चुक झाली, मला माफ कर, पुन्हा असे होणार नाही. मी तुझ्या सोबत लग्न करतो, असे फेसबुक मॅसेज तिला पाठवले. परंतु त्याच्यावरील विश्वास उडाल्याने तिने लग्न करण्यास नकार दिला.

फेसबुक मॅसेजवर धमकी

तिने लग्नास नकार दिला असता, मयुरने तिला पुन्हा फेसबुकवरच ‘तुझे ३५ तुकडे करेन’, माझ्या घरच्यांना सांगशील तर तुझे फोटो सोशल व्हायरल करेन, अशी धमकी दिली. मात्र सर्वस्व हिरावलेल्या पिडिताने तिच्यावर झालेल्या बळजबरीची कहानी त्याच्या कुटुंबियांना सांगितली. त्यामुळे त्याने तिचे संपूर्ण फोटो तिच्या कुटुबांमध्ये व्हायरल केले. तथा तिची बदनामी केली.

अहमदाबादहून आला अमरावतीत

तक्रारकर्ती तरूणी मोर्शी येथील रहिवासी असून, तिचे मे २०१८ मध्ये लग्न झाले. मात्र, त्यांच्यात विसंवाद निर्माण झाला. त्यामुळे तिने पतीविरूध्द मोर्शी पोलिसांत काैटुंबिक छळाची तक्रार नोंदविली होती. ते प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नातेवाईक असलेल्या मयुरशी तिची ओळख झाली. आपण लग्न करू, अशा आणाभाका त्याने दिल्या. तो ४ नोव्हेंबर २०१९ रोजी अमरावतीला आला. तिला देखील बोलावून घेतले. तीन दिवस तिच्यासोबत अमरावतीच्या गेस्ट हाऊसमध्ये राहून तो अहमदाबादला निघून गेला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावतीSexual abuseलैंगिक शोषण