शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन’मधून झाली मुलगी; मग म्हणाला ‘तो मी नव्हेच’!

By प्रदीप भाकरे | Updated: September 29, 2022 18:08 IST

लैंगिक शोषण : १३ वर्षानंतर झाले ‘ब्रेकअप’, लग्नाची टाळाटाळ पोहोचली पोलीस ठाण्यात

अमरावती : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत असताना त्या दाम्पत्याला एक मुलगी देखील झाली. मात्र, त्याने त्यानंतर देखील पूर्वीसारखीच लग्नाच्या नावावर टोलवाटोलव केली. समाजही मुलीचा पिता विचारू लागले. त्यामुळे तिच्या संकटात नवी भर पडली. त्यामुळे तिने लग्नाचा तगादा आणखी वाढविला. मात्र, तब्बल १३ वर्षांची ‘रिलेशनशिप’ एका झटक्यात मोडत त्याने तिला मारहाण केली. शिव्यांची लाखोली वाहिली. अखेर २८ सप्टेंबर रोजी उशिरा रात्री तिने राजापेठ पोलीस ठाणे गाठले.

याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी मनीष सुधाकर मानमोडे (३१, सोनार मंगल कार्यालय, न्यु गणेश कॉलनी, अमरावती) याच्याविरूध्द बलात्कार, छळ, मारहाण व शिविगाळ केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी हे एकमेकांना ओळखत होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांमध्ये प्रत्यक्ष संवाद वाढला. फोन कॉल्स सुरु झाले. त्यामुळे त्या प्रेमसंबंधाबाबत तिच्या पतीला देखील माहित झाले. त्यामुळे त्याने तिला सोडले. त्यावेळी आरोपी मनीष याने ‘मै हू ना’ स्टाईलने तिला धीर दिला. जून २००९ ते आतापर्यंत ती छळमालिका चालली.

भांगेत कुंकू भरतो, लग्नही करतो 

पतीने सोडल्यामुळे आरोपी तिला न्यु गणेश कॉलनी येथील घरी घेऊन आला. तुझ्या भांगेत कुंकू भरतो, लग्नही करतो, असे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ते दोघे गोपालनगर येथे लिव्ह इन’मध्ये राहत होते. तेथे देखील तिने आरोपीला लग्नाबाबत वारंवार विचारणा केली. त्यावेळी वडिलांच्या तब्येतीची कारणे देऊन त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शोषण करण्यात आले. त्यातून तिने एका मुलीला देखील जन्म दिला. लग्नाचे नाव काढताच तिला मारहाण व शिवीगाळ करण्यात आली.

जून २००९ पासूनचा तो एकंदिरत घटनाक्रम आहे. मुलगी झाल्यानंतरही आरोपीने लग्नास टाळाटाळ चालविल्याची तिच्या तक्रारीत नमूद आहे. त्यावरून आरोपीविरूध्द गुन्हे दाखल केले. 

प्रशाली काळे, सहायक पोलीस निरिक्षक, राजापेठ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती