शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्ड काढण्याच्या बहाण्याने बोलावले, जंगलात नेऊन महिलेवर अत्याचार

By प्रदीप भाकरे | Updated: June 12, 2023 15:27 IST

तीन महिन्यानंतर गुन्हा

अमरावती : रेशन कार्ड काढण्याच्या बहाण्याने कलेक्टर ऑफिसला बोलावून एका महिलेवर जंगलात नेऊन बलात्कार करण्यात आला. १५ मार्च रोजी दुपारी १२.३० नंतर ती घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी शेख इरफान उर्फ सलमान सब्जीवाले वल्द शेख उस्मान (रा. अमरावती) याच्याविरूद्ध ११ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास अपहरण, बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल केला.

येथील एका महिलेने आरोपी शेख इरफानकडे रेशनकार्ड बनविण्यासाठी दिले होते. त्यातून त्यांची ओळख झाली. दरम्यान, १५ मार्च रोजी आरोपीने तिला रेशनकार्डसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतले. रेशनकार्ड घेण्यासाठी ती तिच्या मुलासह पोहोचली. त्यावेळी आरोपी तिला तिच्या मुलासह येथून दहा किमी अंतरावरील जंगलात घेऊन गेला. आरोपीने पिडिताच्या मुलाला मोबाईलमध्ये व्हिडीओ लावून दिला. त्याला त्यात गुंतवून ठेवत त्याने पिडितावर जबरदस्ती अतिप्रसंग केला. त्याबाबत वाच्यता केल्यास तिच्या पतिला व मुलाला मारण्याची धमकी दिली.

आरोपीने पिडिताला भावाला धमकावले

आरोपी शेख इरफान हा तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडिताच्या भावाला मोबाईल कॉल केला. तेरी बहनको मै अपनी औरत मानता हू’ असे तो बरळला. त्यामुळे पीडिताला तिच्या भावाने हा काय प्रकार आहे, अशी विचारणा केली. त्यामुळे १५ मार्च रोजी घडलेला प्रसंग तिने भावासह पतीजवळ देखील कथन केला. त्यांनी तिला धीर देत पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यावरून तिने ११ जून रोजी नागपुरी गेट पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणAmravatiअमरावती