शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजबाहेर निघ; तुला सोडणार नाही; अल्पवयीन मुलीला गर्भित धमकी

By प्रदीप भाकरे | Updated: March 14, 2023 14:23 IST

चांदूररेल्वे येथील घटना; गुन्हा दाखल

अमरावती : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिचा विनयभंग करणे, छेड काढणे, अपहरण करून बलात्कार करणे, अशा घटनांमध्ये अलिकडे वाढ झाली आहे. ग्रामीण असो वा शहर दिवसाकाठी चार ते पाच घटनांमध्ये एफआयआर नोंदविला जातो. अनेकांना जन्मठेप व सक्तमजुरीची शिक्षा देखील सुनावली जाते. मात्र, तरीदेखील अशा संतापजनक प्रकारांमध्ये घट झालेली नाही. शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याच्या घटनेची शाई वाळते न वाळतेच एका कॉलेजकन्येला बलात्काराची धमकी देण्यात आली. त्यामुळे समाजमन हादरले आहे.

याप्रकरणी, चांदुररेल्वे पोलिसांनी १३ मार्च रोजी रात्री ९.२७ च्या सुमारास आरोपी कुणाल गजानन वानखडे (२१, कळमगाव, ता. चांदूररेल्वे) या माथेफिरूविरूध्द विनयभंग व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. १३ मार्च रोजी दुपारी १२ ते १२.१० च्या सुमारास चांदूररेल्वे शहरात ही घटना घडली. १७ वर्षे पाच महिने वयाची विद्यार्थीनी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास बारावीचा पेपर देण्याकरीता परिक्षा केंद्राकडे जात होती. तेवढ्यात आरोपी दुचाकीस्वार कुणालने तिला कट मारला. तथा तिचा विनयभंग केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने तू कॉलेजच्या बाहेर ये, तुला सोडणार नाही, मारून टाकतो, अशी गर्भित धमकी दिली. त्या धमकीमुळे सैरभैर झालेल्या त्या विद्यार्थीनीने कसाबसा पेपर दिला. अगदी घाईने घर गाठले. सारा प्रकार पालकांच्या कानी घातला. रात्रीच्या सुमारास तिेने चांदूर रेल्वे पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न

अन्य एका घटनेत एका ४५ वर्षीय महिलेला विवस्त्र करण्याचा संतापजनक प्रकार चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात घडला. १२ मार्च रोजी रात्री ती महिला स्वत:च्या शेतात पाणी व्यवस्थापनाचे काम करीत होती. तेवढयात आरोपी भालचंद्र देशमुख (४५) हा तेथे पोहोचला. तू पाण्याचे काम करू नकोस, असे म्हणून त्याने तिला शिविगाळ केली. तथा विनयभंग केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग