शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

इन्स्टावर ओळख, लग्नाचे आमिष अन् अत्याचार करून रफुचक्कर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 15:56 IST

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून तिला कारमध्ये बसवून हिंगोली येथे वाशिम बायपास रोडलगत निर्जनस्थळी घेऊन गेला.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलगी परभणीची : अमरावतीच्या हॉटेलमध्ये अतिप्रसंग

अमरावती : इन्स्टाग्रामवर झालेली ओळख एका अल्पवयीन मुलीचे सर्वस्व हिरावून गेली. मूळच्या परभणी येथील असलेल्या त्या अल्पवयीन मुलीवर हिंगोली बायपास व अमरावतीमधील एका हॉटेलमध्ये अतिप्रसंग करण्यात आला. तिला त्या हॉटेलमध्ये सोडून तो एकटाच रफुचक्कर झाला. 

पीडितेची सुमारे वर्षभरापूर्वी आरोपीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आरोपीने चॅटिंग करून फिर्यादीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोपी हा त्याच्या चारचाकी वाहनाने फिर्यादीच्या राहत्या घरी परभणी येथे पोहोचला. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून तिला कारमध्ये बसवून हिंगोली येथे वाशिम बायपास रोडलगत निर्जनस्थळी घेऊन गेला. तेथे ‘मैं तुझसे बहोत प्यार करता हूँ, मै तुझसे शादी करुंगा, मुझे तुझसे बच्चा होना, असे म्हणून त्याने वाहनातच तिच्यावर अतिप्रसंग केला. तिला कारने न सोडता त्याने तेथेच तिच्याशी वाद घातला. तिला परभणीच्या एसटीत बसून दिले. त्यानंतरही फोनवरुन सतत लग्नाचे आमिष दाखवून तिला वाशिम बायपासवर नेऊन तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नास नकार देऊन त्याने आपला विश्वासघात केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी अशफाक पठाण अहमद खान (रा. हिंगोली) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२), ४१७, व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.

अमरावतीत दोन दिवस मुक्काम

आरोपीने २९ एप्रिल रोजी फिर्यादीला संपूर्ण सामान पॅक करायला लावून चारचाकी वाहनाने परभणी येथून अमरावती येथील राजकमल चौकातील एका हॉटेलमध्ये घेऊन आला. तेथेदेखील तिच्याशी अतिप्रसंग करण्यात आला. अमरावतीत दोन दिवस थांबून १ मे रोजी त्याने हॉटेलमधून चेक आउट केले. आपण पुण्याला जाऊन लग्न करू व तेथेच सोबत राहून संसार करू, असे म्हणून त्याने १ मे रोजी दिवसभर कारमधून फिरविले.

संध्याकाळी त्याच हॉटेलसमोर आणून तिला कारमधून उतरू दिले. ‘गुटखा पुडी घेऊन येतो, तू येथेच थांब,’ असे म्हणून तो तेथून निघून गेला. त्यानंतर पीडितेने आरोपीच्या मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क साधला असता त्याने मोबाईल बंद करून ठेवल्याचे लक्षात आले. येथील एक ओळखीची महिला तिला त्या दिवशी घरी घेऊन गेली. लग्नाच्या नावावर आरोपीने आपली लैंगिक फसवणूक केल्याचे लक्षात येताच तिने २ मे रोजी रात्री शहर कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPOCSO Actपॉक्सो कायदा