शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्याने चक्क तिच्या नियोजित सासरी घातला धुडगुस; लग्न केल्यास आत्महत्येची धमकी

By प्रदीप भाकरे | Updated: February 10, 2023 13:00 IST

पाठलाग करुन विनयभंग : प्रकरण पोहोचले पोलीस ठाण्यात

अमरावती : एकतर्फी प्रेमातून कोण काय करेल, कुणाला धमकी देईल, कुठे पोहोचेल, सांगता येत नाही. अशाच एका वनसाईड लव्ह’मधून एक मजनू चक्क तरुणीच्या नियोजित सासरी पोहोचला. लग्न करून तिला सून म्हणून तुम्ही घरात आणाल, तर मी जीवाचे बरेवाईट करेन, अशी धमकी चक्क तिच्या वागदत्त सासुबाईला दिली. त्याचे ते एकतर्फी प्रेम त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हददीत ८ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे एकच्या सुमारास विशाल यादव (रा. गोपालनगर) याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, विशाल यादव व तरूणी परस्परांच्या परिचयातील आहे. तो संबंधित तरूणीचा घरापर्यंत पाठलाग करायचा. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, दरम्यान, एक दिवस ती बाब तरूणीच्या लक्षात आली. सामाजिक बदनामी टाळण्यासाठी तिने त्याला पाठलाग का करतो, अशी विचारणा केली. त्यावर माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुच हवी आहेस, मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे, असा तो बडबडला. त्यावर तिने त्याला ठामपणे नकार दिला. ते समजून न घेता त्याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. त्याने त्याच्या एकतर्फी प्रेमाला देखील पुर्णविराम लावला नाही.

रात्रीला पोहोचला, धिंगाणा

दरम्यान, तरूणीचे लग्न जुळल्याची बाब त्याच्या कानावर गेली. त्यामुळे तो बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास तरूणीच्या नियोजित सासरी पोहोचला. तेथे धिंगाणा घालत तिचे लग्न झाले, तिला सून म्हणून तुम्ही घरी आणले, तर मी तेव्हाच आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. ही बाब नियोजित सासुने तरूणीला फोन कॉल करून सांगितली. त्या घटनेने दोन्ही कुटुंब डिस्टर्ब झाले. अखेर तरूणीनेच मनाचा हिय्या करत बुधवारी रात्रीच पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती