शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जेलमध्ये जाईल, परतून खुन्नस तर काढेनच, माथेफिरूची तरुणीला धमकी

By प्रदीप भाकरे | Updated: April 10, 2023 17:16 IST

कॉलेजकन्येचा पाठलाग, विनयभंग

अमरावती : तू माझा मोबाईल कॉल न उचलल्यास तुला मारून टाकेन. कारागृहातही जाईल, मात्र परत आल्यावर खुन्नस काढल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्भित धमकी एका कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीला देण्यात आली. ६ एप्रिल रोजी येथील एका कॉलेजबाहेर हा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी ९ एप्रिल रोजी आरोपी रवि किसनराव धुर्वे (रा. अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण, धमकी व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, यातील अल्पवयीन पीडिता ही एका कनिष्ट महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास महाविद्यालयातील क्लास संपवून ती बाहेर पडली. त्यावेळी आरोपीने त्याची दुचाकी अचानक अगदी वेगाने तिच्यासमोर आणली. तिची छेड काढत तिच्या गालावर थापड मारली. तू माझा फोन उचलला नाही, तर तुला मारून टाकेन, आईवडिलांना सांगितल्यास मी जेलमध्ये जाईन, मात्र तिकडून परत येताच त्यांना जिवे मारल्याशिवाय राहणार नाही. जेलमधून परत आल्यानंतर खुन्नस काढल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्भित धमकी त्याने दिली.फोनवरून त्रास

त्या माथेफिरू धमकीने ती नखशिखांत हादरली. कशीबशी घरी पोहोचली. आईच्या कुशीत शिरून तिने दुपारचा प्रसंग तिला सांगितला. ८ एप्रिल रोजी उशिरा रात्री तिने आईसह गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. आरोपी रवी हा गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या मोबाईलवर कॉल करून प्रचंड त्रास देत असल्याचे देखील तिने तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती