शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्याचा ‘प्रपोझ डे’ कोठडीत गेला; चॉकलेट व टेडी डे देखील पोलिसांच्याच सान्निध्यात

By प्रदीप भाकरे | Updated: February 8, 2023 16:52 IST

जवळीक, प्रेम, फोटोसेशनआड अतिप्रसंग : पिडितासह तिच्या आईला धमकी

अमरावती : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका १८ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या २९ वर्षीय आरोपी प्रियकराला लोणी पोलिसांनी मंगळवारी गजाआड केले. त्यामुळे त्याचा ‘प्रपोझ डे’ कोठडीत गेला. १० फेब्रुवारीपर्यंत त्याची पोलीस कोठडी असल्याने त्याचा चॉकलेट व टेडी डे देखील पोलिसांच्या सान्निध्यात होणार आहे.

एका १८ वर्षीय तरूणीच्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी आरोपी भुषण नाना सोळंके (२९, जळू) याच्याविरूध्द ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास बलात्कार, विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याला तातडीने अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुमारे पाच वर्षांपासून फिर्यादी व आरोपींची ओळख आहे. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. १ जानेवारी २०१८ पासून त्यांच्यातील परिचय घट्ट होत गेला. तुझ्यावर आपले प्रेम आहे, अशी बतावणी करून तो तिच्याशी जबरदस्तीने बोलू लागला. तिच्याशी जवळीक साधत होता.

जून २०२१ मध्ये पिडिताची आई कामाला गेली असता ती घरी एकटीच होती. त्यावेळी आरोपी भुषण तिच्या घरात शिरला. माझ्या मोबाईलमध्ये तुझे अश्लिल फोटो काढलेले आहेत, तु माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेव, अन्यथा मोबाईल मधील ते फोटो व्हायरल करेन, अशी धमकी त्याने दिली. त्या धमकीआड तिच्यावर वारंवार अतिप्रसंग केला.

आईला दिला धीर

त्या सर्व प्रकाराने पिडिता प्रचंड घाबरली. तुझा मोबाईल क्रमांक ब्लॉक करीत असल्याचे त्याला ठणकावून सांगितले. मात्र, त्यावर आरोपीने आपल्यासह आपल्या आईला देखील जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पिडिताने नोंदविली. पिडिताच्या आईने तिला धीर दिला. तथा ७ फेब्रुवारी रोजी लोणी पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिचे बयाण नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.

१८ वर्षीय पिडिताच्या तक्रारीवरून मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. आरोपीला तत्काळ अटक केली. तथा त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- मिलिंदकुमार दवणे, ठाणेदार, लोणी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीSexual abuseलैंगिक शोषण