मल्ल्या, अदानींचे कर्ज माफ

By Admin | Updated: January 8, 2017 00:15 IST2017-01-08T00:15:32+5:302017-01-08T00:15:32+5:30

सर्वसामान्य भरडून निघाला असताना विजय मल्ल्या, अदानी यासारख्या उद्योगपतींचे अब्जावधींचे कर्ज माफ केले जात आहे.

Mallya, forgive Adani's debt | मल्ल्या, अदानींचे कर्ज माफ

मल्ल्या, अदानींचे कर्ज माफ

अमरावती : सर्वसामान्य भरडून निघाला असताना विजय मल्ल्या, अदानी यासारख्या उद्योगपतींचे अब्जावधींचे कर्ज माफ केले जात आहे. देशाचा पोशिंदा मात्र मरतो आहे. शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी दिलीच पाहिजे, असा नारा आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, संजय खोडके, बबलू देशमुख, संजय अकर्ते, आदींनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अलीकडे कार्यकर्ते व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील विदारक स्थिती अवगत करून दिली. आ.वीरेंद्र जगताप, आ.यशोमती ठाकूर, संजय खोडके आणि बबलू देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटबंदीसंबंधीची जिल्ह्यातील स्थितीही जाणून घेतली. ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील बँकांत ११०० कोटी रुपये जमा झालेत. ५९२ कोटी रुपयांचे विथ्ड्रॉल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
आंदोलनात आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू देशमुख , प्रदेश सरचिटणिस संजय खोडके, माजी आ.सुलभा खोडके, पुष्पा बोंडे, माजी आमदार केवलराम काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय अकर्ते, विलास इंगोले, बबलू शेखावत, किशोर बोरकर, प्रकाश काळबांडे, प्रकाश साबळे, बँकेचे संचालक सुरेश साबळे, हरिभाऊ मोहोड, संजय मार्डीकर, संजय मापले, संजय वानखडे, अभिजित देवके, मोहन सिंघवी, प्रल्हाद ठाकरे, विद्या देदू, छाया दंडाळे, अर्चना सवाई, उषा उताणे, विद्या देडू, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, अनिल बोके, हसिना शहा, सिद्धार्थ वानखडे, गणेश आरेकर, मोहन पाटील, भागवत खांडे, स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर, माजी महापौर वंदना कंगाले, श्रीराम नेहर, सिद्धार्थ वानखडे, अजय गुल्हाने, श्रोपाल पाल, सतीश हाडोळे, अविनाश राजगुरे, अभिनंदन पेंढारी, कमलेश तायडे, दिलीप काळबांडे, जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अनंत साबळे, भैया पवार, बापुरार गायकवाड मुकद्दर खाँ पठाण, सुभाष पाथरे, दीपा लेंडे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाविरोधात तसेच त्यामुळे झालेल्या भ्रष्टाचाराची निष्पक्षपणे चौकशी करून झालेल्या नुकसानीची नागरिकांना योग्य ते नुकसान भरपाई मिळावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)

सहा व्यापाऱ्यांवर गुन्हे
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध फौजदारीचे निर्देश दिले होते, त्याचे काय झाले, असा महत्त्वाचा प्रश्न आ. जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान उपस्थित केला. त्यावर आतापर्यंत कमी भावाने सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Mallya, forgive Adani's debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.