मालिनी शंकर यांनी केली झीरो बजेट शेतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 00:10 IST2016-07-02T00:10:34+5:302016-07-02T00:10:34+5:30

झीरो बजेट नैसर्गिक शेतीची पाहणी करण्याकरिता राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या पालक सचिव ....

Malini Shankar made ZERO budget farming survey | मालिनी शंकर यांनी केली झीरो बजेट शेतीची पाहणी

मालिनी शंकर यांनी केली झीरो बजेट शेतीची पाहणी

शेतकऱ्यांशी संवाद : रघुनाथपूरला दिली भेट
तिवसा : झीरो बजेट नैसर्गिक शेतीची पाहणी करण्याकरिता राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या पालक सचिव मालिनी शंकर यांनी आज तिवसा तालुक्यातील रघुनाथपुर येथे भेट देऊन यासंदर्भात इत्यंभूत माहिती जाणून घेतली.
झीरो बजेट शेतीचे सर्वेसर्वा सुभाष पाळेकर यांचा नुकताच केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्काराने गौरव केला. यानंतर प्रथमच शासनाने पाळेकर यांच्या झीरो बजेट शेतीची दखल घेत अभ्यास करायला सुरुवात केली आहे. गुरुवारी मालिनी शंकर या तिवसा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शेतकरी आत्महत्या थांबविण्याकरिता तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून वाचविण्याकरिता झीरो बजेट शेती ही काळाची गरज असल्याची सुभाष पाळेकर यांची संकल्पना आहे. प्रत्येक शेतकऱ्याने या शेतीचा अवलंब केल्यास अतिशय कमी खर्चात चांगल्या प्रतीचे पीक व उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो.

Web Title: Malini Shankar made ZERO budget farming survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.