विद्यापीठाचे मैदान पोलीस भरती चाचणी सरावासाठी उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:00+5:302021-02-05T05:28:00+5:30

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मैदान तरुण, युवकांना पोलीस भरती चाचणी सरावासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सोमवारी प्रहार ...

Make the University grounds available for police recruitment test practice | विद्यापीठाचे मैदान पोलीस भरती चाचणी सरावासाठी उपलब्ध करा

विद्यापीठाचे मैदान पोलीस भरती चाचणी सरावासाठी उपलब्ध करा

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मैदान तरुण, युवकांना पोलीस भरती चाचणी सरावासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सोमवारी प्रहार संघटनेच्यावतीने करण्यात आली. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्रभारी कुलसचिव हेमंत देशमुख यांना सादर करण्यात आले.

प्रहारचे वसू महाराज यांच्या मार्गदर्शनात चंदू खेडकर यांच्या नेतृत्वात ही मागणी करण्यात आली. येत्या काही दिवसांत राज्यात पोलीस भरती राबविली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांना पोलीस भरतीची संधी मिळावी आणि विद्यापीठाचे मैदान पोलीस भरती चाचणी सरावासाठी उपलब्ध करावे, अशी मागणी करण्यात आली. बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठाने मैदान पोलीस भरती चाचणी सरावासाठी मिळावे, असे निवेदनातून म्हटले आहे. यावेळी चंदू खेडकर, पंकज सुरडकर, अजय तायडे, आशिष दामले, राजू कडू, हर्षद विटेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Make the University grounds available for police recruitment test practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.