तिवसा शहर उपाययोजना करून डेंग्यूमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:17 IST2021-08-24T04:17:55+5:302021-08-24T04:17:55+5:30
तिवसा : तिवसा शहर डेंग्यू मुक्तता करण्यात यावे, या मागणीचे तिवसा शहर भारतीय पक्षाच्यावतीने मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना निवेदन ...

तिवसा शहर उपाययोजना करून डेंग्यूमुक्त करा
तिवसा : तिवसा शहर डेंग्यू मुक्तता करण्यात यावे, या मागणीचे तिवसा शहर भारतीय पक्षाच्यावतीने मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी नगरपंचायतसमोर मेणबत्ती जलाव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
मागण्यांमध्ये पाणीस्थळाची व पाणी टाकीची संपूर्ण साफसफाई करणयात यावी. प्रत्येक प्रभागात दररोज घरोघरी डेंगी निर्मूलन फवारणी करावी. शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा. नदी-नाले गटारे साफसफाई करून फवारणी करण्यात यावी. शहरात पाण्याचे डबके साचत आहे, ते दुरुस्ती करण्यात यावे. पिंगळाई नदीकाठावरील गाळ व वाढलेले गवत साफसफाई करण्यात यावी आदी मागण्यांसंदर्भात चर्चा करून मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपचे मिलिंद देशमुख, जिल्हा भाजपचे नेते शंतनु देशमुख, मोहन वानखडे, शेखर नंदनवार, राहुल आंबूलकर, नीलेश खेकडे, प्रशांत डहाके, डॉ. संजय गोंडसे, डॉ. लीलाधर कराडे, सुरज वानखडे, प्रवीण चौधरी, अंकुश ठाकरे, दीपक गंधे, सुनील सुरटकर, गोविंद जस्वानी, अतुल भरडे आदींची उपस्थिती होती