‘ती’ शाळा राष्ट्रीय स्मारक करा
By Admin | Updated: January 4, 2017 00:24 IST2017-01-04T00:24:15+5:302017-01-04T00:24:15+5:30
पुणे (भिडे वाडा) येथील देशातील मुलींची पहिली शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी ....

‘ती’ शाळा राष्ट्रीय स्मारक करा
मुख्यमंत्र्यांना निवेदन : अ. भा. माळी महासंघाची मागणी
अमरावती : पुणे (भिडे वाडा) येथील देशातील मुलींची पहिली शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी यासह इतर मागण्यांकरिता मंगळवारी अखिल भारतीय माळी महासंघ व सहयोगी संस्थाच्यावतीने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. कांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून चित्रा चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी अ.भा. माळी महासंघ, फुलमाळी महासंघ, व अन्य संस्थाच्या संयुक्त विद्यामाने काढण्यात आलेल्या रॅली पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांन मार्फत मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनात महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानगंगोत्री आई सावित्री फुले या दाम्पत्यांनी पुणे येथील बुधवारपेठेतील भिडे वाड्यात सन १ जानेवावरी १८४८ रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या देशामध्ये अंधारात, काळोखात खितपत पडलेल्या समाजाला उठवून जागे करण्याचे कार्य व देशाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणात आहे व या देशातील स्त्रीने शिक्षण घेतल्यास म्हणजेच ‘जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती देशाचा विकास करी’ या तत्त्वाप्रमाणे स्त्री शिक्षण हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुण्यातील मुलींची पहिली शाळा शासनाने त्वरित राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी तसेच अमरावती महापालिका क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात यावा आदी मागण्या निवेदनाव्दारे केल्या आहेत. यावेळी अ.भा. माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर, संजय अंबाडकर, विनायक देशमुख, श्रीकांत नागरीकर, अरविंद आकोलकर, प्रभाकर घोटोळ, रुपेश फसाटे, संजय वाघुळे, प्रकाश लोखंडे, ज्योतिबा मेहरे, मंगला चांदूरकर व अन्य पदाधिकारी, महिला व युवक, युवतींचा समावेश होता.