‘त्या’ जलवाहिनीसाठी निधी उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 00:12 IST2017-04-16T00:12:14+5:302017-04-16T00:12:14+5:30
नगरपंचायत क्षेत्रातील आनंदवाडी, अशोकनगरसह पाच वॉर्डांमध्ये आठ किमी अंतरावरील सातरगाव येथून पाणीपुरवठा करण्यात येतो.

‘त्या’ जलवाहिनीसाठी निधी उपलब्ध करा
यशोमती ठाकूर : जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा
तिवसा : नगरपंचायत क्षेत्रातील आनंदवाडी, अशोकनगरसह पाच वॉर्डांमध्ये आठ किमी अंतरावरील सातरगाव येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र ही जलवाहिनी जीर्ण झालेली असल्याने पाणीपुरवठा वारंवार खंडित होतो. याविषयीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यावर निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांकडे केली.यासह विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.
येथील जिल्हाधिकाऱ्यांना वहिवाटीचे अनेक रस्ते, विहिरींची कामे, खचलेल्या विहिरींची कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. हा निधी पंचायत समिती व तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. नगरपंचायतीने शासन निर्णयान्वये कामे करण्याचा ठराव घेतला आहे. तसेच जॉब कार्डदेखील वितरित केले आहे. मात्र, ही कामे अद्याप प्रलंबित होती. ग्रामविकास व नगरविकास विभागातील संभ्रम दूर करून कामे मार्गी लावावी, अशी मागणी आ. ठाकूर यांनी केली. येथील नागरी दलित वस्ती सुधारणेसाठी नगरपंचायतीद्वारा प्रस्ताव पाठविण्यात आला. या कामांसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. (प्रतिनिधी)
पीएम आवास योजना, ओबीसींना घरकूल द्या
नगरपंचायत क्षेत्रातील १६५ ओबीसी लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.