पाटबंधारे विभागाच्या इमारतीचे मेंटेनन्स शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:50 IST2018-06-03T22:49:20+5:302018-06-03T22:50:04+5:30

३५ ते ३८ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या इमारतीचे दागडुजी करून रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Maintenance of building of Irrigation Department is zero | पाटबंधारे विभागाच्या इमारतीचे मेंटेनन्स शून्य

पाटबंधारे विभागाच्या इमारतीचे मेंटेनन्स शून्य

ठळक मुद्देरंगरंगोटी केव्हा? : अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ३५ ते ३८ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या इमारतीचे दागडुजी करून रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
मागील वर्षीच इमारतीचे स्ट्रकचरल आॅडिट करण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. मात्र, यातील एक इमारत क्षतिग्रस्त असल्याने यामध्ये कुणालाही राहण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी ३०० पेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी रहिवासी आहेत. मात्र, काही ठिकाणचे शौचालय व प्रसाधनगृह चांगले नाही, तर काही ठिकाणी इमारतीला तडे गेलेले आहेत. त्याकारणाने या ठिकाणी विशेष निधी मंजूर करून पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील निवास्थानाची देखभाल दुरूस्ती करण्यात यावी व या ठिकाणी इमारतींची रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ज्या इमारती क्षतिग्रस्त झाल्या आहेत व ज्याला तातडीने देखभाल व दुरूस्तीची आवशक्त आहे, अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटींचा आरखडा तयार करून तो मंजुरीसाठी विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सांडपाणी बाहेर काढण्यासाठी ३५ लाखांचा खर्च
कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानातील सांडपाणी बाहेर काढण्यासाठी सांडपाण्याच्या भूमिगत नाल्यांचे बांधकाम करून ते पाणी पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधून मुख्य नालीत सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तुंबणाऱ्या नाल्या व त्यापासून निर्माण होणारी डासांची उत्पत्ती यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: Maintenance of building of Irrigation Department is zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.