गुणवत्ता राखून सौंदर्यीकरण करा
By Admin | Updated: July 1, 2016 00:17 IST2016-07-01T00:17:02+5:302016-07-01T00:17:02+5:30
शहरात सुरु असलेल्या रस्ता चौपदरीकरण्याच्या कामाची पाहणी अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बच्चू कडू यांनी केली.

गुणवत्ता राखून सौंदर्यीकरण करा
बच्चू कडूंच्या सूचना : चौपदरीकरण भूमिगत, गटाराची पाहणी
परतवाडा : शहरात सुरु असलेल्या रस्ता चौपदरीकरण्याच्या कामाची पाहणी अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बच्चू कडू यांनी केली. भूमिगत गटार नाल्याच्या कामाची गुणवत्ता व रस्ता दुभाजीकरण्यासाठी सूचना त्यांनी उपस्थित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
परतवाडा शहरात तिसऱ्या टप्प्यातील रस्ता दुभाजीकरणाचे कार्य जयस्तंभ चौक ते बाजार समितीपर्यंत सुरू आहे. अमरावती-परवतवाडा व येथून अकोला, इंदूर, बैतूल असा आंतरराज्यीय महामार्ग आहे. शहरातील अरुंद रस्ते, वाढती वाहन व लोकसंख्या पाहता शहरात वाहतुकीची कोंडी होत असे. आ. बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून शहर रस्ते चौपदरीकरणासह सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले. पुढील टप्पा बाजार समिती ते मिल कॉलनी स्टॉप अशा चांदूरबाजार नाका पर्यंत होणार आहे. कामाच्या दर्जाची ओरड होण्यापूर्वीच आ.बच्चू कडू यांनी पाहणी केली.
दोन्ही बाजूंनी टाईल्स, रंगोटी
रस्ता चौपदरीकरणात रस्ता दुभाजकावर शोभीवंत आणि पथ दिवे लावण्याते काम प्रगतीपथावर आहे. वृक्ष संवधर्नासाठी लोखंडी जाळी लावण्यात आली असून त्याला सोनेरी रंगाची रंगरंगोटी तर चौपरीकरणा नंतरच्या फुटपाथ व रिक्त डांबरीकरणानंतर शिल्लक रस्त्यावर टाईल्स लावण्यात येणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. पी. भावे, उपअभियंता प्रमोेद भिलपवार, शाखा अभियंता एस.आर. फाटे, गोपाल बकाले, सह प्रहारचे बल्लू जवंजाळ, अनिल पिंपळे, प्रवीण पाटिल, प्रशांत आवारे, अंकुश जवंजाळ, संजय जैस्वाल, भाष्कर मासूदकर सह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)